Thursday, May 24, 2012

जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..


जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..

ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय..

कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..

ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यासधाडस करत
नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय..

ज्या वेळी माझे बाहू थकलेत पाय थकलेत
हात थकलेत शरीर थकलय
त्या वेळेस मला समोर मला "एव्हरेस्ट" दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या "एव्हरेस्ट" च्या दिशेने टाकाचय..
तो " स्टार " मला गाठाचाय
मला "सत्यासाठी" झगडाचय संघर्ष कराचाय..

कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही..

माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण "स्वर्गीय" असलं पाहिजे..
जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..




जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..

जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय..


कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..

ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यासधाडस करत
नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय..

ज्या वेळी माझे बाहू थकलेत पाय थकलेत
हात थकलेत शरीर थकलय
त्या वेळेस मला समोर मला "एव्हरेस्ट" दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या "एव्हरेस्ट" च्या दिशेने टाकाचय..
तो " स्टार " मला गाठाचाय
मला "सत्यासाठी" झगडाचय संघर्ष कराचाय..

कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही..

माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण "स्वर्गीय" असलं पाहिजे..

जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..

Wednesday, May 23, 2012

शेवटचे पान

    वहीचे शेवटचे पान पहिल्या पानापेक्षा निराळे असते. या दोन पानांत मैलाचे अंतर असते. पहिले पान देखाव्याचे किती किती सोवळे. शेवटला देखावा नाही मनाने पण मोकळे. पहिल्यावर एक सुटसुटीत नाव एकच पत्ता एकच गाव आणि "शेवटच्या पानावर ?"कोणाचेही पत्ते, कोणाचीही नावे शेवटच्या पानाची अनेक गावे. 
लेख --शेवटच्या परीक्षेचा रिझल्ट लागला का आपल्या वह्या रद्दीची वाट भागतात पण त्यावर आपल ते वर्ष अवलंबून होत कधी कधी आपण ते विसरतो.तीच रद्दीच्या ढिगार्यात एखादी वही दिसते आणि ती सहजच चाली जाते.पहिल्या पानापासून ते शेवटच्या पण पर्यंत पहिले कोरे, पांढरे फटफटीत शेवटचे रंगीत तेवढेच टवटवीत. ह्या sglyaa  कृती पाहिल्यावर आख्या वर्षाच्या  आठवणींचा "फ्लँशबँक" होतो आणि आठवतात ते शाळा काँलेजचे दिवस ते वहीच्या शेवटच्या पानावर खेळलेला फुलीई गोळ्याचा गेम असो वा ते गप्प बसून केलेलं "ऑफ लाईन  च्याट" ... आज ही त्या शेवटच्या पानावरची अक्षरे आपल्या मनात जपून ठेवलेल्या शाळा,काँलेजच्या आठवणींना उजाळा देतात.आणि लेक्चर मधल आपल अक्षर बाईंचा शेरा सगळाच कस आपल्या नजरे समोर तो बोलपट धावू लागतो. त्या पानावर नेहमीच असायच्या अबोल पण नकळत व्यक्त झालेल्या भावना,त्यावर लेक्चर मध्ये केलेला टाइमपास नावत्या शिक्षकांच्या तासाला "आपल्या केवडा" कडे टाकलेला कटाक्ष व तिच्यावर लिहिलेली ती मोडकी तोडकी,त ला त भिदाव्लेली चार ओळी देखील त्या पानावरच असायची.त्या पानावर काढलेल ते बदामाच चित्र  त्या खाली केलेली नावांची खोडी..त्या अक्षरांवर कस आख्या वहीचा सार असल्या सारख वाटत  कारण वाहिचीई आधीची पान तर फक्त मार्क मिळवायला मदत करायची  आणि शेवटच पानावर  हीच अक्षरे जीवनात पुढे जाण्या साठी काहीस अबोल संदेश देऊन जायची.मस्ती करण्यासाठी एकमेकांना कागदाचे बोले फेकून मारण्या साठी याच पानाचे लचके तोडले जायचे.पण या पाने कधीच याची तक्रार दाखून दिली नाही. एकाद्या विषयाची वही आणली नाही तर कोणत्याही वहीच्या शेवटच्या पण पासून नवीन वही मग सालच कस ते उलट उलट लिहित जान.या शेवटच्या पानावरच्या आठवणीमनाला फार छळतात तर कधी फार आनंद देतात तर कधी डोळ्यात पाणी आणतात...कर एकदा मला आमच्या बाईनी फुली गोळा खेळताना पकडल आणि मग काय.शेवटच पान फाडून मुख्याध्यापकाना दाखवायला तेच पान फाडून पुरावा करण्यात आला होता.मार खाला त्याच की वाल नाही पण शेवटच पण फाडल्या मुळे माझ्या नावच पण पण नकळत निघाल होत.पाहिलं आणि शेवटच पान एकच असायचं पण मधल्या स्टेपलर मुळे त्यांच्यात अंतर पडल  पहिल्याचा तोरा, भारी डौलनाही कळायचे शेवटाचे मोल. शेवटच्या पानाला उभ्या, आडव्या, तिरक्या रेघोट्या विविध आकृतींच्या अनेक राहुट्या. कुणीही यावे लिहून जावे आपले नाव ठेवून जावे . हि दोन पण एकच असून त्यात इतक अंतर कस पडल हे मला कधीच समजलाच नाही.वही मध्ये जपावे ते शेवटचे   पान कुणीही दावी आपली शान राग नाही, लोभ नाही सगळेच कसे सम समान कुणाचे काहीही होवो,..... .. माझे मात्र एक व्हावे होता आले तर माझे जीवन शेवटचे पान व्हावे!          --- संकलन --- कृणाल चिलप