Wednesday, May 30, 2012

college चा प्रत्येक क्षण

college चा प्रत्येक क्षण,
प्रत्येक अनुभव वाटला रे नवा..

१st year ला आलो तेव्हा वाटले ,
४ वर्ष कधी सरतील रे देवा..
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..||

college चे पहिले काही दिवस,
अभ्यासाचा दिवस उजाडत नव्हता ..
... कारण मनी घरच्या आठवणीचा पाउस ,
धो-धो पडत होता..

हळूहळू रंगी -बेरंगी मित्र झाले ,
तेवढ्यातच EXAM नावाचे सत्र आले,
sac च ओझे घेऊन कोणी देउलात ,
कोणी ग्राथालयात निघाले ,
तरीही
कोणी YEAROUT, FRONTFOOT
तर कोणी backfoot वर आले ,
तेव्हा मनात लागला,
enGINEERING काय असते याचा रे दिवा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..

college मध्ये कोणाला मिळतो प्रेम गुच्छ,
तर कोणी म्हणते प्रेम असते तुच्छ..
तस माझे हि प्रेम फुल फुलले,
एका फुलावर मनपाखरू जडले,

२ मनाचे गुलाबी पतंग सजले,
कधी कधी
रुसवा-फुगवाचे नाट्य घडले..
तरीही शेवटी मनाने,
प्रेमाचे प्रत्येक समीकरण सोडवले..
प्रत्येकाला व्हावा वाटतो कोणाचा तरीरे छावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..

जेव्हा जेव्हा miscall ,sms वाजायची
mobile रिंग ,
तेव्हा आमची स्वारी निघायची,
class To Parking..
वेळो-वेळी मदतीसाठी धाऊन आले
मित्र, शिक्षक सगळे ,
खरच college दिवस असतात खूप वेगळे..
अन्न college च्या प्रत्येक वस्तू,वास्तू,

परिवाराशी माझ नात आहे जगावेगळे..
आठवणीना घेऊन निघालो रे आमच्या गावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा.

तेव्हा मला कळले....

गणिताची समीकरणे सुटता सुटता
शाळेचे वर्ष सरले..
साहजिकच पाय इथल्या कॅम्पसमध्ये वळले
कॉलेज म्हणजे काय
हे तेव्हा मला कळले.

... वर्गातील मुले पाहून हृदय जोरात धडधडले
... लेक्चर आहे का मीटिंग
तेच नाही समजले
तेवढ्यात लक्ष माझे तिच्यावर
स्थिरावले
कॅम्पसच्या विषाणूंनी या मनाला घेरले


लेक्चरला असतानाही मन
कॅण्टीनमध्ये बसले
अभ्यासाचे ओझे मग गप्पांनी विरघळले
क्लासटीचरने आमचं रजिस्टर चेक केले
उपस्थिती पाहून माझी नाव माझे गाळले

engg सटिर्फिकेट तेव्हा धावून आले
हा हा म्हणता म्हणता
कॉलेजचे वर्ष सरले
इतक्या गोड आठवणींचे फक्त
तुकडेच उरले

मग आठवले, अरे तिला विचारायचेच राहिले
अहो सेण्डऑफ म्हणजे काय हे
तेव्हा मला कळले....

Sunday, May 27, 2012

चिरेबंदी वाडा

चांदोबाचे घर आहे,
लिंबोणीच्या झाडामागे.
वाडा त्याचा चिरेबंदी '
आजी माझी रोज सांगे....

आईच्यां कडेवरून 
दुधभात खाताना,
वळून वळून पाही मी,
त्या चिरेबंदी वाड्याला....

लिंबोणीचे झाड रुसून
कुठे निघून गेले,
चिरेबंदी वाडे सारे
गोष्टीतच राहून गेले.... 

कधीतरी थांबतो हात ,
कालवताना दुधभात, 
फसवुनी गेला चांदोबा
मला मात्र हातोहात....

रिते मन खुळे उदास,
आजही पाहतो आकाशी,
दिसेल का तो चांदोबा,
त्या चिरेबंदी वाड्यापाशी.....