Sunday, June 17, 2012

तुझ्या ओठांवरचा नकार....

तू दिलेल्या जखमा देखील...
हव्याहव्याश्या वाटतात...
कदाचित त्या जखमान मुळेच...
तुझ्या आठवणी ताज्या राहतात....
...
हल्ली स्वप्नांचं आणि माझं...
तसं नातच तुटलंय...
कारण मन माझं हल्ली....
तुझ्या आठवणीत बुद्लंय...

तुला जपतांना हल्ली दुखं..
माझ्या जवळपासच येत नाही...
कदाचित माझ्या कडे त्यांना देण्या इतका..
वेळच उरत नाही...

किती दा तरी तुला सांगितलं...
सांग तुझ्या मनातलं...
तुझ्या नाही जमलं तर निदान...
ओळख कधी माझ्या तरी मनातलं...

तुझे डोळे रोज सांगतात...
मला तुझ्या मनातला होकार...
पण मग मला काहीच बोलू देत नाही...
तुझ्या ओठांवरचा नकार....

कधी इतकं प्रेम झालं...


कधी इतकं प्रेम झालं...
काही कळलच नाही,
कधी इतकं वेड लावलस...
काही कळलच नाही.
पहिल्यांदा कधी आवडलीसहे खरचं नाही आठवत,
... पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं नाही राहवत.
चेहरा आठवतो ना तेव्हा काय सांगू कसं कसं होतं?...
आसुसलेल्या आभाळाकडे पाखराने उडावं ना तसं होतं,
उन्हामधुन दमुन सावलीतयावंना तसं होतं.
तुझं हसनं म्हणजे नक्की सांगू तरी कसे?
सुकलेल्या जमिनीवर सरीँनी कोसळावे ना तसे.
तुझं भेटनं म्हणजे नक्की सांगू तरी कसे?
बुडत्या सुर्याने समुद्राच्या मिठीत जावे ना तसे.
पण सांग ना इतकं कसं कुणी सुंदर असू शकतं?
बहुतेक हे तुझं गेल्या जन्मीचं केलेलं पुण्यअसु शकतं.
पाहु नको आरशात तु जाशील गं पाहुन मागे त्याचं काय
होतं हा तरी विचार कर.
अशीच नेहमी वाहत रहा,
मला डोळे भरून पाहत रहा,
पार भिजवुन टाक मला तुझ्या प्रेमात..