Tuesday, March 29, 2011

एकदा काँलेज मध्ये प्रेम मलाही झालं होतं ...

एकदा काँलेज मध्ये प्रेम मलाही झालं होतं ...
माझ जीवन बहारलं होतं..
तिच्या निरागस डोळ्यांमध्ये जसं स्वर्ग ऊतरलं होतं ...

तिच्या शांत स्वभावात
शांत आकाशाचं अस्तित्व दाटलं होतं ...
जणू दुरवर असलेला ध्रृवताराचं असं माझ्या खुळ्या मनाला वाटलं होत..

तिच्या हसण्याने माझं मनचं घायाळ झाले...
माझ्या साठी तिचे शब्द अमृत तर माझे शब्दचं मुके झाले...

जागामध्ये भरकटणार मनं
आता काँलेज मध्ये भरकटु लागलं वर्ग असोवा कँटीन तिचाच शोध घेऊ लागलं

तिच्या मुळे प्रेमाला अर्थ होता कारण तिच्या साठीचं
KK मधला कवी हरवला होता...

शब्दांनी अज्ञात वास घेतला

शब्दांनी अज्ञात वास घेतला तर माझी कविता पोरकी होईल....
तुझ्या त्या लांब जाण्याने माझा ऊर भरुन येईल....

थोड थांबाव म्हणतं असशील तर मी म्हणेल थांबु नकोस...
या धावत्या जगात थांबलास तर जग तुला BYE करून पुढे निघुन जाईल....

तरी ही तु थांबलास मी पुढे जाताजाता तुला बोलवतचं राहील ...

शेवटी जाताजाता तुझ्या कडेचं पाहतं राहील....
पुढे गेल्यावरही .....
माझ्या सोबत एक वेडा कवी देखिल होता हे जगाला सांगत राहील...

आत्मविश्वासाचे पंख

आकाशात उत्तुंग ऊडणा-या
गरुडालाही ढगांचे अडथळे पारकरावे लागतात....

राज्या सारख्या सिंहालाही , अनेक पराक्रम घडवावे लागतात....

पाण्यात पोहणा-या माशालाही लाटांचे मार सोसावे लागतात....

जिवनात पुढे जाणा-यानांच विचारांच्या भेदक नजरा लागतात....

शेवटी प्रश्नांसाठीचं उत्तरे असतात....

कारण,
"आत्मविश्वासाचे पंख कधीच दिसत नसतात."

महाराज आज आठवणं येते तुमची ....

महाराज आज आठवणं येते तुमची ....


स्रीवर नजर ऊठवणा-यांचा जागीच जिव घ्याना..
हा जातीवाद करुन समाजात फुट
पाडणा-या गद्दारांना कडेलोटाची शिक्षा द्याना...


त्या झोपलेल्या मराठी माणसाला तुम्हीचं जागवाना...
पुन्हा या डोळ्यांना स्वराज्याचं गोजिरवान स्वप्न दाखवाना...


राजकारण्यांनी बलात्कार केलेल्या या महाराष्ट्राच्या मातीची परीस्थिती पहाणा...
महाराज विनंती करतो पुन्हा एकदा या धरतीवर याना..
तुमचा आदेश पुन्हा एकदा द्याना..

 
मग बघा ...हे राजकारणी तुमच्या पायावर लोळन घेत म्हणतील,
महाराज अजुन एक संधी द्याना...

पुन्हा एकदा...

पुन्हा एकदा पुन्हा एकदा...
स्री ची माँ समान तुलना होईल...

राजकारण्यांनी विकुन खालेल्या,
 या महाराष्ट्राच्या मातीची तुलना आई समान होईल...

इतिहासाची पान साक्ष देत पुन्हा वरती येऊन..
महाराजांच्या पराक्रमाची किर्ती गायिल..
या पैशांची पुन्हा एकदा राजमुद्रा होईल...

याच डोळ्यांनी पुन्हा एकदा या मातीसाठी,
 गोजिरवान स्वप्न पाहील..
पुन्हा एकदा रायगडावर 22हजारदशलक्ष होनांच,
 सोनेरी शिवसिंहासन स्थापन होईल..


"छत्रपती शिवाजी महाराजकी,जय" ही किंकाळी पुन्हा एकदा,
मराठ्यांच्या मनामनाला, या मातीच्या कणाकणाला ,भेदुन जाईल...
आज पुन्हा वाटतं............
  या मातीत आमच्या शिवबाच्या आधि माँ साहेब जिजाऊंचा जन्म होईल...

असं का वाटतयं ...

आज
मला काहीतरी विसरल्या सारखं
का वाटतयं ?
अथांग आकाशही मोकळं का वाटतयं...
पुस्तकातले शब्दचं हरवलेत असं
का वाटतयं ...
शब्दांमधल्या भावनाही हरवल्यातं असं
का वाटतयं ...
कविता लिहायलां घेतल्यावर विचारातं
हरवल्या सारखं का वाटतयं ...
विचारांमध्ये मन गुंतल्या सारखं
का वाटतयं ...
कुणीतरी नकळतं आपल्याला स्पर्श करुन
जातयं ..
असं का वाटतयं...
त्या स्पर्शाला शोधता शोधता मी त्या स्पर्शातचं
हरवल्या सारखं का वाटतयं ...

छानं ते समोरचं झाडं

छानं ते समोरचं झाडं, त्याच्या झुकलेल्या फांदीवर बसून दोन पाखरं नेहमी किलबिलकरायची...
तुलाही सवयं झालेली त्यांना आपल्यात पहायची..
त्यांच्या सारखंच आपलंही घरटं असावं झाडांच्या फांदीवर झुलणार..
तुझ्या हजार प्रश्नांवर माझं नेहमीच गप्प राहणं..
तुझ्या कडे फक्त केविलवाने पाहणं...
कारण, त्या एका फांदीवरच्या पाखरांच घरटं मात्र एक नव्हतं..
तुझी माझी साथ अशीच होती कारण, ते प्रेम नव्हतं...

मी.माज़ा न राहिलो

मी.माज़ा न राहिलो
प्रेमात तिच्या पुरता बुडालो
तिला कधी हे कळलेच नाही
माज्या भावना तिच्या पर्यंन्त
कधी पोहोचल्याच नाहीत
हे मला खूप उशिरा कळले
ज्या दिवशी मी तिला Propose
करण्याचे ठरवले
त्याच दिवशी मला कळले
she has already one boy friend
मी पुरता हबकलो
आठवणीँच्या जाळ्यात गुरफ़टुन गेलो
तिला तिच पहिल प्रेम मिळु दे ,
म्हणुन मी केला त्याग
माज़्या प्रेमचा
ती त्याच्या सोबत सुखात राहो
हीच ईश्वराचरणी प्रार्थना
आता मी एकटा आहे
तिच्या आठवणीँच्या सोबतीने जिवन
जगतो आहे
हे जिवन खूप मोठ आहे
हि तर नुकतीच सुरवात आहे
आता मी
मला तिचा Brother मानत असलो तरी
ती परत येईल अशी वेडी आस धरुन आहे
ती "April Full" करते आहे याची पुर्ण
कल्पना आहे

माय मराठी

व्हिसा Stamp झाल्यावरती.. एकाच
धावपळ उडून गेली
भवितव्याच्या स्वप्नांनी रे ..तहान
भूक हरवून गेली ...
भेटी झाल्या ,खरेदी झाली ..ब्याग
सुद्धा भरून झाली
सारख्या सूचना देता देता ..आईची धांदल
उडून गेली ..
तासामागून तास गेला ..आणि flight
ची वेळ जवळ आली ..
निरोप द्यायला विमानतळावर..
सवंगडयानी गर्दी केली ..
कौतुक
आणि काळजी तुझ्या बाबांच्या ..चेहऱ्यावर
दिसून गेली ...
पाठ
फिरता तुझी ..त्यांची पापणी सारं
बोलून गेली .
आरे आपली माती.. आपली माणसं , देश
आपला विसरू नको .!
विमान उडालं जेव्हा एकेक डोळा..
पाण्याने भरला असेल .
अगदी अखेरच्या क्षणी मित्रा..
मनानं बंड केलं असेल .
नकोच जायला परदेशात.. एकदा नक्कीच
वाटलं असेल .
आरे आकांक्षाच्या पंखानाही..
अश्रुनी जखडून टाकल असेल .
लिंकन चे शब्द आठव ...अश्रू
ढालायाची लाज वाटू देऊ नकोस .
गीतेमधला उपदेश आठव... हात पाय
गाळून बसू नकोस .
अरे अटकेपार झेंडे लाव ..पण माय
मराठी विसरू नकोस .!
अरे अन्न दिले , वस्त्र
दिले ....सह्याद्रीने ओसरी दिली .
आई - बापाने कष्ट करून ...भरून
ज्ञानाची शिदोरी दिली .
गुरुजनांनी संस्कार दिले ..
गावकर्यांनी यारी दिली .
अरे टपरीवरच्या अप्पाने ने हि..
वेळो वेळी उधारी दिली .
देश सुटला , पोटासाठी ...बंध इथले
तोडू नको .
पोटासाठी मित्रा ..दहा दिशांनी जायला हवं.
दिशा देण्या प्रवाहाला ..प्रवाहापुढे
पाळायला हवं .
कासवासारखा विश्वासान.. एकेक पावूल
टाकायला हवं .
अरे
आठव्या घरच्या प्याद्यासारखा ..वजीर
म्हणून जपायला हवं.
एखादा स्वप्ना देशासाठी..
आपणही पहिला हवं
वेवसिकतेच्या दुनियेत या..
भावनांना हि जपायला हवं .
नमस्कार सांग लिबर्टीला.. पण
आईभवानी विसरू नको .!
स्वर्ग सुख सगळी मित्रा हात जोडून
उभे असतील .
भुरळ पडतील तुला अन मग
मर्यादेला हसत बसतील .
जिम असेल . क्लब असतील ,
मैदानेही भरत असतील .
मंद मंद उजेडात
कुठेतरी पार्ट्या सुद्धा होत
असतील .
रॉक अन्ड रोल वर बेभान हो ...पण स्वर
लताचा विसरू नको .!
पंखात शक्ती आल्यावर पाखर ..दुवर
उडून जातात .
आई -वडिलांच्या घरट्यात मग..
आठवणींची भूत राहतात .
अरे आठवणींची भूत ..रोज आईला भेट
देतात .
स्वप्नात भेटेल तुला तर तिची झोप
सुद्धा पळवून नेतात .
आईच्या चरणी परत ये स्वप्नात
सुद्धा रमू नको .!
वाट पाहत मित्र तुझा ...पानपट्टीवर
थांबला असेल .
मग तुझ्या वाटणीचा ग्लास
कुठेतरी ..पार्टीत तसाच उरला असेल .
ब्याट घेऊन पिंट्या ....एकटाच
मैदानात उतरला असेल .
तुझ्याविना संघ महाद्या .... फायनल
म्याच हरला असेल .
अरे
भेटीसाठी तुझ्या ...इथला प्रत्येकजण
आतुरला असेल .
आणि आठवणीनी गावच्या कधीतरी...
तुझाही उर भरला असेल .
भरारी मार उंच आकाशी ..पण
मातीशी नातं तोडू नकोस .!
आईची ती माया आठव ...तू फक्त परत ये .
वडिलांचे अश्रू आठव ...तू फक्त परत
ये
मनमोहनसिंग चे शब्द आठव.....तू फक्त
परत ये .
अब्दुलकलाम चा विश्वास आठव ...तू
फक्त परत ये .
पहिली ब्याटींग तुझी मित्रा...तू
फक्त परत ये .
अप्पाही उधारी मागणार नाही ..तू
फक्त परत ये .
अरे आपली माती आपली माणसे ...देश
आपला विसरू नकोस .
सिलिकॉन व्हेलीत जा ...पण माय
मराठी विसरू नको .

Monday, March 28, 2011

आई

किती वर्षे निघूण
गेली तुला काहीतरी सांगायचं होत...
पण या जिवनात मोठं
होण्याच्या नादात
लहानपणं विसरायचं होतं ...
मला आजही आठवतो तु माझा हात धरुन
काढलेला तो पहिला "शून्य" तेच माझ
पहिलं अक्षरं होत...
आज मी इतका मोठा झालो,कारण
त्या शून्याचं विश्व निर्माण
करण्यासाठी तु तुझ्या रक्ताचं
पाणी केलं होतं ...
शाळेत जाताना तुझा तो मायेचा हात
माझ्या डोक्यावर होता ,
चालताना तुझ्या त्या साडीच्या पदराचा टोक
माझ्या हातात होता ... त्या पदराचं
अस्तित्व आजही हाताला जाणवतं
होतं ...
पण,
आता घरी कोणीतरी आपलं केविलवाणं
वाट
पाहतयं असं कधीच वाटत नव्हतं ...
आजही आठवतं
जेव्हा मी घाबरलो आणि तु
मला तुझ्या त्या मायेच्या कुशीत
घेतलं ...
आज तु नाहीसं म्हणून आज
ह्या डोळ्यांमध्ये दोन थेंबांच
अस्तित्व दाटलं ...
वाटलं हातात पैसा आहे जीवन आहे "लै
भारी"
पण.....
पण.....
"आई , मी तुझ्या विना भिकारी "

अबोला सहन होईना

स्वप्न आले डोळ्यावरती चिंबभिजल्या भावना,
अश्रु सुकले थेंबावरती
ओठांवर शब्द आता का येईना...
बोलना आई हा अबोला सहन होईना..


तु शिकवल्या अक्षराची ओळ का पुसली जाईना, तुझ्या प्रेमाच्या शब्दांची सांगता आता का होईना...
शब्द रुसले सुरांवरती गीत तयार होईना..
बोलना आई,
हा अबोला सहन होईना...


लिँबोनीच्या झाडामागे तो चंद्र का जाईना...
ह्या डोळ्यांवरती झोपेचे सोंग आता का येईना..
तुझ्या त्या मायेच्या कुशीची उब आता आठवेणा
उठ आई घेणा कुशीत ,
हा अबोला सहन होईना


तु मला सोडुन गेलीस याची कल्पनाही सहन होईना...
देव का ही इतका कठोर ?
तो ही तुला परत पाठवेणा ...
भिती वाटते..
तो तुला फुला सारखं सांभाळेलना ?
आई , तु त्या ता-यात दिसलीस
तो बिचाराही विरहाने आता लुकलुकेना.
उठना आई ,
डोळे उघडंना आई,
काहीतरी बोलना आई.
तु इतकी ही का गाढं झोपलीस ?
आता कुणीच तुला का जागवेणा...
अगं ,ह्या अश्रुंनाही वाट मोकळी होईना..
बोलना आई ,
अबोला सहन होईना


ते सर्व तुला कुठे घेऊन चाललेत सांगना.
अगं आई काहीतरी बोलना.
ते दारातलं वृंदावनही आर्शिवाद आता का देईना.
आई ,
माझ्याशी तु का बोलली नाहीस ?
ह्या एका प्रश्नाचं उत्तर आता देणा..