Wednesday, March 20, 2013

क्षणात फोन पण कट झाला सॉरी ………… केला …

ते प्रेम जवळ जवळ दीड वर्ष मनात जपलेल …. 

संवाद फक्त काही क्षणांचा …
……… 
………… 
……………… 
मन पासून प्रेम होत …. 
प्रत्येक क्षणा क्षणाला तिची आठवण मनात असायची …… 
प्रत्येक्षात ती मला कधीच नाही भेटली ……. 
पण हृदयाच्या त्या नाजुकश्या हालचाली सारख तीच अस्तित्व जाणवायचं …. 
………. 
…… 
तिला एकदिवस भेटून सांगेन ठरवल होत.….
तिच्या भावाशी बोलन झालं …भेटण्यासाठी नकार आला ……  
तिच्या मैत्रिणीन सोबत बोलन झाल…. आम्ही की करू…. ? सांगून बघतो …
अशीच उत्तर …… 
तरी भेटण्यासाठीचा अखंड प्रवास चालूच…। आतच मनाची तडफड …भेटण्यासाठी कासावीस….   
दीड वर्षाच्या आठवणींच्या प्रवास नंतर अखेर तो दिवस आज आलाच होता …

तिच्या मैत्रिणीच्या फोनवर फोन केला ती  बाजूलाच होती…………
तिच्याकडे तिने फोन दिला  जो आवाज ऐकण्यासाठी कान बेचेन झाले होते हृदयाची गती वाढली होती …
एकही शब्द मला miss करायचा नव्हता ……शब्दन शब्द अलगद झेलायचा होता …
जो आवाज मला जीवनभर आयुष्याचा सोबती म्हणून ऐकायचा होता…
फक्त काही क्षणात सर आटोपलं …
मी फक्त २ मिनिट मागितले होते ……
सार काही फक्त ५ सेकंदात संपेल अस वाटलच नव्हत ……
…… 




पण ते संपल होत …
तो एकच शेवटचा क्षण …… दीड वर्षाच्या प्रतिक्षेची किंमत काय तर रागात बोलायचे ते दोन शब्द …. 
आणि तो पाच सेकंदाचा कालावधी …. 
मला बोलताच नाही आल कारण, तिला बोलताना मला थांवायचं नव्हत …
क्षणात  फोन पण कट झाला सॉरी ………… केला …



आता तिच्यासाठी परत वाट पहावी का तिला विसरून जाव ………. ?

प्रेम विसरण्यासाठी केल असत तर कधीच विसरलो असतो,
पण माझ प्रेम इतक तकलादू नव्हत कि कोणी तरी बोलाव आणि मी ते विसराव …
कदाची आता ते विसराव लागेल……… 
हो , विसरावंच  लागेल कारण, 
"तिच्यावर प्रेम करण्याची चुकी मी केली होती" …… 
. . 
पण आता या वेड्या मनाची कशी समजूत घालू ?
जे आजही तिच्या येण्याची आस लाऊन आनंदात तिची वाट पाहतोय …
माझ्या दुखा: साठी मी त्याच्या सुखाचा लचका नाही तोडू शकतना………. 

-नकळत 
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]  

Sunday, March 17, 2013

मी तुझ्यावर आज हि तितकंच प्रेम करतो …

मी तुझ्यावर आज हि तितकंच प्रेम करतो … 
कदाचित तुला प्रेम म्हणजे की हे कधीच उमगले नाही … 
मी काही न बोलता उगाच तुझ्यावर प्रेम करत राहिलो का ?
मला आजही फक्त तू हवी आहेस.…. 
किमान एकदा तरी बोलून बघ… 
किती दिवस तू हा असा अबोला धरून बसणार ?
एक वर्ष …. एक महिना…. एक दिवस.… 
यापेक्षा हि खूप कालावधी लोटला आता…. 
रुसवा,फुगवा  सोडून भेट एकदातरी… 
मला आयुष्यात फक्त तू हवी आहेस बाकी काहीच नको… 
मी प्रेम केल ते त्या निरागस डोळ्यांवर….
मी प्रेम केल त्या नाजुकश्या ओठांवर .…
…. 
……. 
………
अस. मी कधीच नाही बोलणार  
कारण,मी तुझ्या मनावर प्रेम करतो बाकीच्या गोष्टी तर खूप थिल्लर आहेत.….
तुला एकदा शेवटच भेटेन म्हणतोय …. 
कदाचित माझ्या नशिबात आणि हृदयात
या मध्ये फक्त एवढाच फरक आहे
जो ह्रदयात आहे,
तो नशिबात नाही ...
आणि....?
जो नशिबात आहे 
तो ह्रदयात नाही .....
पण जरी माझ्या नशिबात नसलीस तरी  माझ्या ह्रदयात तुझी जागा कोणी घेऊ देखील शकणार नाही…
आणि मी ती कोणाला देणार ही नाही… 
प्रेम हा काही भातुकलीचा खेळ नाहीये कि आपल्या मर्जी नुसार सगळ बदलत रहाव…
मी तुझ्यावर प्रेम करतो आणि कायम करणार… 
नाही तरी जीवनात हवी असलेली व्यक्ती आणि स्वतः ला पडलेल्या प्रश्नांची उत्तर कधी सापडतच नाही ….  
विचारातून काढलाय केव्हाच तुला
पण माझ्या काव्यातून तू जात नाही
काळजात बसली तू अशी कि
तुजा चेहरा क्षणभरही नजरेआड होत नाही..!!!!!
तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही.....

-मनाची वेदना [कृणाल चिलप(K.K.) ]