Friday, May 3, 2013

परीक्षेची पहिली आणि शेवटची रात्र ….



अरे, उद्यापासून पेपर चालू होत आहेत 
अभ्यास झाला का ?
नाही रे,"तुझा झाला का?
कसल, काय?"अजून बुक पण नाही उघडली
."सोलिड वाट लागणार आहे ….बाय द वे ,"तुला सेंटर कुठल आल?"
माझ सोड, तुला कोणत आल ते सांग ?
चल भाय तु तर आपल्याच बरोबर आहेस फिकर नॉट आपण manage करू सगळ अशा हवेतल्या काही फुशारक्या.
अस काहीस बोलत आपल्या शाळे पासून कॉलेज पर्यंतची प्रत्येक परीक्षा चालू होते. मग , सोशल साइट वरून महत्वाचे importance शोधन,ग्रुप मध्ये चर्चा,एकमेकांना फोनाफोनी करून तर कधी नाईट मारून अभ्यासाला सुरुवात होते.हे कर हा हे लास्ट टाईम आल होत आता परत चान्सेस आहेत.तो दहा मार्क्स चा प्रश्न येणारच येणार तो करून जा बाकी ठोक सगळ मनाच. अशा गप्पा पेपरच्या आधी रंगतात आणि पेपरला सुरुवात होते.पेपर हातात कि सगळ काही वेगळ वाटत एकमेकांच्या चेहेर्याकडे बघत पेपर लिहायला सुरुवात होते.वाचलेलं सगळकाही विसरलेल असत आणि मग उत्तर लिहिणारा स्वतःच त्या विषयाचा ऑथर {लेखक} बनतो आणि उत्तर लिहायला सुरुवात होते . कसाबसा पेपर पूर्ण होतो.नंतर पेपर संपल्यावर चर्चा "शिट,यार १० मार्कचा पेपर राहिला माझा" . "मला वाटल होत ते येईल पण केल नाही यार" …"मला तर पहिले वाटल कि पेपरच पोर्शनच्या बाहेरचा आहे लिहिला कसाबसा ".सोड ना अरे बाकीच लिहिल ना… भरलास ना पेपर मग तर पास होऊनच जाशील. आणि नाहीच झाला तर भेटूच कि के.टी . exam la .पण उद्याचा जर सिरीयसली करायला पाहिजेहा तो विषय जर अवघड आहे. 
पण ब-याच कॉलेजीयन्सच्या ;लाईफ मध्ये अभ्यास बाबत सिरियस हा शब्द कधी येताच नाही. रात्री नाईट मारायला बसल कि झोप लागते आणि मोबाइल वर आलाराम लाऊन अभ्यासाचा प्लान सकाळी पोस्टपोन होतो.आणि सकाळी उठल कि आता काय वाचायचं ? यात सारा वेळ निघून जातो. पहिल्या पेपरचा आधल्या रात्री सारख्याच दुसर्या, तिसर्या …. पेपरच्या रात्री सरतात….लवकरात लवकर संपावीशी वाटणारी परीक्षा संपते आणि वेकेशन मध्ये उनाडक्या करायचे प्लान तयार होतात.नंतर रिझल्ट लागतो …क़े.टी. लागते … कधी फस्ट क्लास पण भेटतो आणि ते वर्ष संपत … नेक्स्ट सेमला अभ्यास करायचा हा अशी आश्वासन एकमेकांना आणि घरच्यांना देत पुढच्या वर्षाच कॉलेज देखील चालू होत.
पण, लास्ट इयर च्या लास्ट सेमच्या परीक्षेला हे चित्र तसच असत अगदी जस च्या तस पण ते सगळ शेवटच… तो शेवटचा अभ्यास …. तो शेवटचा बेस्ट लक चा मेसेज …. रात्री झोप लागते म्हणून थर्मास मध्ये भरून ठेवलेल्या चहाचा तो शेवटचा कप आणि अभ्यासात जागवलेली ती शेवटच्या पेपरची शेवटची रात्र.हसत-रडत, दंगा-मस्ती करत कॉलेजची तीन वर्ष हसत संपलेली असतात.त्या रात्री नंतर कोण अभ्यासासाठी जागणार नसत."रात्री दोन पर्यंत तरी बसा अभ्यासाला, वर्षभर काही केल नाही आता तरी करा." अस कोण बोलणार नसत कारण ते सगळ शेवटच असत.
पेपरच्या आधी चहाच्या टपरीवर लवकर येउन केलेला अभ्यास, स्वत:हाच पुस्तक सोडून दुसर्याच्या पुस्तकातडोकाऊन केलेला तो अभ्यास आणि शेवटच एकमेकांना केलेल ते बेस्ट लक.
त्या शेवटच्या पेपर सारख सार काही संपत. ते अभ्यासच आश्वासन,टपरीवरचा चहा,सगळ्यांनी एकाच वहीत केलेला अभ्यास आणि कधी कधी पेपर लिहिण्यासाठी मागितलेला तो उधारी वरचा पेन.
शेवटच्या पेपर मध्ये लिहिलेल्या शेवटच्या वाक्याचा पुर्विराम सगळ्यालाच पूर्णविराम देऊन टाकतो. या वेळेस पुढची सेम अभ्याससाठी नसते आणि उद्या अभ्यास करून येऊ अस आश्वासन पण नसत कारण त्या वेळेस चालू झालेला असतो तो खरा जीवन प्रवास.… एक "रेस" जिथे मित्र नसतात नातेवाईक नसतात…तिथे असतात ते फक्त कॉमपेटिटर्स .त्यात धावणारे असतात पडणारे असतात कधी सावरणारे पण असतात पण जो तो धावत असतो ते फक्त स्वतः जिकण्यासाठी.आणि या स-यात आठवणीत राहिलेली असते ती फक्त परीक्षेची शेवटची रात्र.

-नकळत
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]