चांदोबाचे घर आहे,
लिंबोणीच्या झाडामागे.
वाडा त्याचा चिरेबंदी '
आजी माझी रोज सांगे....
आईच्यां कडेवरून
दुधभात खाताना,
वळून वळून पाही मी,
त्या चिरेबंदी वाड्याला....
लिंबोणीचे झाड रुसून
कुठे निघून गेले,
चिरेबंदी वाडे सारे
गोष्टीतच राहून गेले....
कधीतरी थांबतो हात ,
कालवताना दुधभात,
फसवुनी गेला चांदोबा
मला मात्र हातोहात....
रिते मन खुळे उदास,
आजही पाहतो आकाशी,
दिसेल का तो चांदोबा,
त्या चिरेबंदी वाड्यापाशी.....
No comments:
Post a Comment