Sunday, June 17, 2012

तुझ्या ओठांवरचा नकार....

तू दिलेल्या जखमा देखील...
हव्याहव्याश्या वाटतात...
कदाचित त्या जखमान मुळेच...
तुझ्या आठवणी ताज्या राहतात....
...
हल्ली स्वप्नांचं आणि माझं...
तसं नातच तुटलंय...
कारण मन माझं हल्ली....
तुझ्या आठवणीत बुद्लंय...

तुला जपतांना हल्ली दुखं..
माझ्या जवळपासच येत नाही...
कदाचित माझ्या कडे त्यांना देण्या इतका..
वेळच उरत नाही...

किती दा तरी तुला सांगितलं...
सांग तुझ्या मनातलं...
तुझ्या नाही जमलं तर निदान...
ओळख कधी माझ्या तरी मनातलं...

तुझे डोळे रोज सांगतात...
मला तुझ्या मनातला होकार...
पण मग मला काहीच बोलू देत नाही...
तुझ्या ओठांवरचा नकार....

No comments:

Post a Comment