Sunday, October 28, 2018


विसरलोय तुला..... 
पण, माहित नाही असं का  होतंय ......


हातात रंग घेतल्यावर.......
नकळत कुठूनतरी तुझा आवाज येतो......
आणि मी हरवून जातो..... 
तुझ्या त्या आवाजात .......
त्या श्वासांची हलकी चाहूल देखील कानांना ऐकायला येते .......
इतके ते अचानक कावरे बावरे होतात .....
शोधू लागतात तुला .....
मनातून , विचारातून ....म्हणावं तर साऱ्यातूनच आता  काढलंय तुला ....
एव्हांना आता असंच काहीसं ठरलंय ......
विसरलोय तुला .....
पण माहित नाही असं का होतंय .......

हातात रंग असताना........
तुझ्या सोबत पाहिलेल्या स्वप्नांचं चित्र विचारात हलकाचं डोकावून जातं ........
त्या क्षणाला .......
त्या विचारला ......बघतांच मी अधिर होतो .......
डोळे रेखाटतात तुझ्या नसलेल्या सावलीला ....
त्या रंगांसोबत......त्या अर्थाला ...... ..नकळत.......
आणि मग.........
तुझ्या त्या आवाज लहरींना कान ऐकत जातात लक्षपूर्वक .......
हृदय शोधतं जाते त्याच्या कुशीतली तु ......
हात रेखाटत जातो ...रंगवत जातो .....त्या पानावर......
एका वाटाड्याने जुनचं ठिकाण......
पण नव्या रस्त्याने गिरवत जाण्यासारखं ....
असं काहीसं होतंय......
विसरलोय तुला ........
पण माहित नाही असं  का होतंय  ...... 
त्या बोटांनी मारलेल्या मिठीतुन तो रंग सुटतचं नाही...... आणि त्या बोटांना तो सोडवतही नाही ......
त्या बोटांना भास होतो .......
तु भोवताली असण्याचा.......
मग  ते रंग नकळत ...... .
त्या आठवणींतल्या "तुला" स्पर्श करतात......
कारण, त्या बोटांना स्पर्श करायला तु अस्तित्वात नसतेस.....
त्या रंगांच्या मिठीतली बोटे देत जातात प्रत्येक रंगला आपल्या वाट्याची जागा .........  
आणि काही क्षणांत ती जागा पण त्या रंगाची झालेली असते ..... .
रंगांच्या त्या रंगीबेरंगी छटा.....
त्या कोऱ्या कागदाचं "पांढर दुःख" दूर करत पसरतं जातात ....
प्रत्येक रंग घेत जातो जागा हवी तेवढी......
निस्वार्थी वृत्तीने .......
त्या बोटांसोबतही असं काहीसं होतंय ...
विसरलोय तुला.......
पण माहित नाही असं का होतंय ...
डोळे निमूटपणे बघत असतात .....
तुझ्या आभासी अस्तित्वाला ........
त्या कोऱ्या कागदाला.....
तुझ्या आठवणींत पुन्हा नव्याने रंगीत होताना..........
उघड्या डोळ्यांनी घट्ट मिटून घेतलेल्या अस्तित्वाला काही क्षणांसाठी मी विसरतो.......
आणि त्या स्वप्नाला अस्तित्वाची जाणीव करून देत  जाणून बुजून त्या कागदावर रेखाटतो ...
तुझ्या आठवणींच्या धुंदीत ....
कोऱ्या कागदाचं रंगीत झालेलं सुख त्यात सामावलं जातं आणि एका चित्र पूर्ण होतं ....
अचानक मी भानावर येतो ...
तेव्हा शब्द सुचत नाही ...
क्षणभर नजर हलतं नाही......
मी ही स्वीकारलेल्या तुझ्या निर्णयाला......
अस्तित्वाची हसरी मिठी घेत रोज एक नवं  चित्र जन्म घेतंय ....
विसरलोय तुला.....
पण माहित नाही असं का होतंय ....
-नकळत तुझी आठवण येते तेव्हा
-लेखन /शब्दरचना / संकल्पना #कृणाल चिलप (K.K.)@©®

Thursday, October 4, 2018

टिपूस

चेक ची एन्ट्री करत असताना अचानक तो थांबला ...
कसला तरी विचार पटकन मनात यावा आणि जगाचा विसर पडावा ....
जसा एखाद्या अगंतुक समयी घड्याळाचा सेल संपावा व ते अचानक बंद पडावं ...पण चित्त आणि मन त्या सेकंद काट्या सारखं ......सारं काही संपावं तरी एक हलकीशी हालचाल .....त्यामुळेच मनही विचार करायचं थांबत नव्हतं ....
   एकटं विचार करत असताना ....
एखाद्या भावनेने साथ द्यावी आणि पाणेरी आठवणींनी त्या डोळ्यावर "एका टिपूसाला" जन्म द्यावा ...
तसे अचानक त्याचे डोळे ओले झाले .....
हलकाचं चष्मा वर करत ....डाव्या हाताच्या अंगठ्याने आणि बोटाने त्या टिपूसला नष्ट करायचा प्रयत्न केला ....
पण तो फेल ठरला ....
त्या टिपूसचा काही भाग गालावरून ओघळून जात असताना मनातल्या संवेदनांच्या काहुराचं सुख दुःख जणू ते रेखाटत होतं ...ते त्यांच्या स्पर्शाने गालाला जाणवलं ही होतं .....
त्या टिपूसच्या काही भागाचं बोट आणि अंगठ्यामध्ये झालेल्या घर्षणाने "बाष्पीभवन" झालं ....
पण ....
त्या टिपूसचा काही भाग उरलेला त्या ......पापण्यांवर ...
त्या डोळ्यांना दिलासा देत थांबलेला तो "टिपूस" .....
पुन्हा तिची आठवण आली हे सांगत साक्ष देणारा ....
..
..
खिशातुन त्याने मोबाईल काढला ....
आणि .....गाणं बंद केलं ....
कॉन्टॅक्ट लिस्ट मधून तिचा नंबर काढला ....व फोन केला ...
"दिज नंबर इज नॉट रिचेबल "... 
त्याने परत एकदा ट्राय केला ....
परत तेच ....... 
..
त्याने मोबाईल बाजूला ठेवला ....
चष्मा काढला ....
गुंतला परत विचारांमध्ये ....आत्ता त्याच्याकडे कारण होतं थांबायला ..... तिच्या त्या विचारांच ..
..
..
कॉम्पुटर स्क्रीन कडे बघून डोळ्यांना त्रास झाला आहे  अन त्यामुळे डोळ्यातून पाणी यावं .....असा काहीसा खोटा अभिर्भाव करत त्या टिपूसचा क्षणांत शेवट त्याने  रुमालाने केला .....
त्याने काढलेला चष्मा लावला .....
इकडे तिकडे हळूच कटाक्ष टाकला ....
टेबलावर पडलेला चेक हातात घेतला ....
Pay....रकान्यातलं नाव परत वाचलं मिस.मिलन भगत ....." नातं " अनाथ आश्रमाच्या संचालिका ज्यांनी या हातांना शिक्षण देऊन अनेक बँकेतले ऑफिसर घडवले होते ...
एन्ट्री मारण्यासाठी हात कि-बोर्ड वर सरकतच होता ....तोच त्या बँकेच्या सॉफ्टवेर च्या लॉग इन चा टाइम आऊट झाला ....
ते प्ले बॅक मध्ये वाजणार मोबाईलमधलं गाणं देखील बंद झालं होतं ....
त्या चेकवरचं नाव त्याने परत एकदा वाचलं .....
तो थांबला त्या नावाची ....आणि त्या नांवासोबतच्या आठवणींची जुळवाजुळव करू लागला .....
.......
...............त्या टिपूसाच्या झालेल्या विभागानी  प्रमाणे ...
..
आणि अचानक ऑफिसातली शांतता भेदावि तसा कोणाचा तरी मोबाईल वाजला ...आणि परत तेच गाणं वाजलं  ......मेरी माँ .....ममा .....

- टिपूस
लेखन / शब्दरचना / संकल्पना
-@©® कृणाल चिलप 14/09/2018