Thursday, October 4, 2018

टिपूस

चेक ची एन्ट्री करत असताना अचानक तो थांबला ...
कसला तरी विचार पटकन मनात यावा आणि जगाचा विसर पडावा ....
जसा एखाद्या अगंतुक समयी घड्याळाचा सेल संपावा व ते अचानक बंद पडावं ...पण चित्त आणि मन त्या सेकंद काट्या सारखं ......सारं काही संपावं तरी एक हलकीशी हालचाल .....त्यामुळेच मनही विचार करायचं थांबत नव्हतं ....
   एकटं विचार करत असताना ....
एखाद्या भावनेने साथ द्यावी आणि पाणेरी आठवणींनी त्या डोळ्यावर "एका टिपूसाला" जन्म द्यावा ...
तसे अचानक त्याचे डोळे ओले झाले .....
हलकाचं चष्मा वर करत ....डाव्या हाताच्या अंगठ्याने आणि बोटाने त्या टिपूसला नष्ट करायचा प्रयत्न केला ....
पण तो फेल ठरला ....
त्या टिपूसचा काही भाग गालावरून ओघळून जात असताना मनातल्या संवेदनांच्या काहुराचं सुख दुःख जणू ते रेखाटत होतं ...ते त्यांच्या स्पर्शाने गालाला जाणवलं ही होतं .....
त्या टिपूसच्या काही भागाचं बोट आणि अंगठ्यामध्ये झालेल्या घर्षणाने "बाष्पीभवन" झालं ....
पण ....
त्या टिपूसचा काही भाग उरलेला त्या ......पापण्यांवर ...
त्या डोळ्यांना दिलासा देत थांबलेला तो "टिपूस" .....
पुन्हा तिची आठवण आली हे सांगत साक्ष देणारा ....
..
..
खिशातुन त्याने मोबाईल काढला ....
आणि .....गाणं बंद केलं ....
कॉन्टॅक्ट लिस्ट मधून तिचा नंबर काढला ....व फोन केला ...
"दिज नंबर इज नॉट रिचेबल "... 
त्याने परत एकदा ट्राय केला ....
परत तेच ....... 
..
त्याने मोबाईल बाजूला ठेवला ....
चष्मा काढला ....
गुंतला परत विचारांमध्ये ....आत्ता त्याच्याकडे कारण होतं थांबायला ..... तिच्या त्या विचारांच ..
..
..
कॉम्पुटर स्क्रीन कडे बघून डोळ्यांना त्रास झाला आहे  अन त्यामुळे डोळ्यातून पाणी यावं .....असा काहीसा खोटा अभिर्भाव करत त्या टिपूसचा क्षणांत शेवट त्याने  रुमालाने केला .....
त्याने काढलेला चष्मा लावला .....
इकडे तिकडे हळूच कटाक्ष टाकला ....
टेबलावर पडलेला चेक हातात घेतला ....
Pay....रकान्यातलं नाव परत वाचलं मिस.मिलन भगत ....." नातं " अनाथ आश्रमाच्या संचालिका ज्यांनी या हातांना शिक्षण देऊन अनेक बँकेतले ऑफिसर घडवले होते ...
एन्ट्री मारण्यासाठी हात कि-बोर्ड वर सरकतच होता ....तोच त्या बँकेच्या सॉफ्टवेर च्या लॉग इन चा टाइम आऊट झाला ....
ते प्ले बॅक मध्ये वाजणार मोबाईलमधलं गाणं देखील बंद झालं होतं ....
त्या चेकवरचं नाव त्याने परत एकदा वाचलं .....
तो थांबला त्या नावाची ....आणि त्या नांवासोबतच्या आठवणींची जुळवाजुळव करू लागला .....
.......
...............त्या टिपूसाच्या झालेल्या विभागानी  प्रमाणे ...
..
आणि अचानक ऑफिसातली शांतता भेदावि तसा कोणाचा तरी मोबाईल वाजला ...आणि परत तेच गाणं वाजलं  ......मेरी माँ .....ममा .....

- टिपूस
लेखन / शब्दरचना / संकल्पना
-@©® कृणाल चिलप 14/09/2018

No comments:

Post a Comment