Sunday, October 28, 2018


विसरलोय तुला..... 
पण, माहित नाही असं का  होतंय ......


हातात रंग घेतल्यावर.......
नकळत कुठूनतरी तुझा आवाज येतो......
आणि मी हरवून जातो..... 
तुझ्या त्या आवाजात .......
त्या श्वासांची हलकी चाहूल देखील कानांना ऐकायला येते .......
इतके ते अचानक कावरे बावरे होतात .....
शोधू लागतात तुला .....
मनातून , विचारातून ....म्हणावं तर साऱ्यातूनच आता  काढलंय तुला ....
एव्हांना आता असंच काहीसं ठरलंय ......
विसरलोय तुला .....
पण माहित नाही असं का होतंय .......

हातात रंग असताना........
तुझ्या सोबत पाहिलेल्या स्वप्नांचं चित्र विचारात हलकाचं डोकावून जातं ........
त्या क्षणाला .......
त्या विचारला ......बघतांच मी अधिर होतो .......
डोळे रेखाटतात तुझ्या नसलेल्या सावलीला ....
त्या रंगांसोबत......त्या अर्थाला ...... ..नकळत.......
आणि मग.........
तुझ्या त्या आवाज लहरींना कान ऐकत जातात लक्षपूर्वक .......
हृदय शोधतं जाते त्याच्या कुशीतली तु ......
हात रेखाटत जातो ...रंगवत जातो .....त्या पानावर......
एका वाटाड्याने जुनचं ठिकाण......
पण नव्या रस्त्याने गिरवत जाण्यासारखं ....
असं काहीसं होतंय......
विसरलोय तुला ........
पण माहित नाही असं  का होतंय  ...... 
त्या बोटांनी मारलेल्या मिठीतुन तो रंग सुटतचं नाही...... आणि त्या बोटांना तो सोडवतही नाही ......
त्या बोटांना भास होतो .......
तु भोवताली असण्याचा.......
मग  ते रंग नकळत ...... .
त्या आठवणींतल्या "तुला" स्पर्श करतात......
कारण, त्या बोटांना स्पर्श करायला तु अस्तित्वात नसतेस.....
त्या रंगांच्या मिठीतली बोटे देत जातात प्रत्येक रंगला आपल्या वाट्याची जागा .........  
आणि काही क्षणांत ती जागा पण त्या रंगाची झालेली असते ..... .
रंगांच्या त्या रंगीबेरंगी छटा.....
त्या कोऱ्या कागदाचं "पांढर दुःख" दूर करत पसरतं जातात ....
प्रत्येक रंग घेत जातो जागा हवी तेवढी......
निस्वार्थी वृत्तीने .......
त्या बोटांसोबतही असं काहीसं होतंय ...
विसरलोय तुला.......
पण माहित नाही असं का होतंय ...
डोळे निमूटपणे बघत असतात .....
तुझ्या आभासी अस्तित्वाला ........
त्या कोऱ्या कागदाला.....
तुझ्या आठवणींत पुन्हा नव्याने रंगीत होताना..........
उघड्या डोळ्यांनी घट्ट मिटून घेतलेल्या अस्तित्वाला काही क्षणांसाठी मी विसरतो.......
आणि त्या स्वप्नाला अस्तित्वाची जाणीव करून देत  जाणून बुजून त्या कागदावर रेखाटतो ...
तुझ्या आठवणींच्या धुंदीत ....
कोऱ्या कागदाचं रंगीत झालेलं सुख त्यात सामावलं जातं आणि एका चित्र पूर्ण होतं ....
अचानक मी भानावर येतो ...
तेव्हा शब्द सुचत नाही ...
क्षणभर नजर हलतं नाही......
मी ही स्वीकारलेल्या तुझ्या निर्णयाला......
अस्तित्वाची हसरी मिठी घेत रोज एक नवं  चित्र जन्म घेतंय ....
विसरलोय तुला.....
पण माहित नाही असं का होतंय ....
-नकळत तुझी आठवण येते तेव्हा
-लेखन /शब्दरचना / संकल्पना #कृणाल चिलप (K.K.)@©®

Thursday, October 4, 2018

टिपूस

चेक ची एन्ट्री करत असताना अचानक तो थांबला ...
कसला तरी विचार पटकन मनात यावा आणि जगाचा विसर पडावा ....
जसा एखाद्या अगंतुक समयी घड्याळाचा सेल संपावा व ते अचानक बंद पडावं ...पण चित्त आणि मन त्या सेकंद काट्या सारखं ......सारं काही संपावं तरी एक हलकीशी हालचाल .....त्यामुळेच मनही विचार करायचं थांबत नव्हतं ....
   एकटं विचार करत असताना ....
एखाद्या भावनेने साथ द्यावी आणि पाणेरी आठवणींनी त्या डोळ्यावर "एका टिपूसाला" जन्म द्यावा ...
तसे अचानक त्याचे डोळे ओले झाले .....
हलकाचं चष्मा वर करत ....डाव्या हाताच्या अंगठ्याने आणि बोटाने त्या टिपूसला नष्ट करायचा प्रयत्न केला ....
पण तो फेल ठरला ....
त्या टिपूसचा काही भाग गालावरून ओघळून जात असताना मनातल्या संवेदनांच्या काहुराचं सुख दुःख जणू ते रेखाटत होतं ...ते त्यांच्या स्पर्शाने गालाला जाणवलं ही होतं .....
त्या टिपूसच्या काही भागाचं बोट आणि अंगठ्यामध्ये झालेल्या घर्षणाने "बाष्पीभवन" झालं ....
पण ....
त्या टिपूसचा काही भाग उरलेला त्या ......पापण्यांवर ...
त्या डोळ्यांना दिलासा देत थांबलेला तो "टिपूस" .....
पुन्हा तिची आठवण आली हे सांगत साक्ष देणारा ....
..
..
खिशातुन त्याने मोबाईल काढला ....
आणि .....गाणं बंद केलं ....
कॉन्टॅक्ट लिस्ट मधून तिचा नंबर काढला ....व फोन केला ...
"दिज नंबर इज नॉट रिचेबल "... 
त्याने परत एकदा ट्राय केला ....
परत तेच ....... 
..
त्याने मोबाईल बाजूला ठेवला ....
चष्मा काढला ....
गुंतला परत विचारांमध्ये ....आत्ता त्याच्याकडे कारण होतं थांबायला ..... तिच्या त्या विचारांच ..
..
..
कॉम्पुटर स्क्रीन कडे बघून डोळ्यांना त्रास झाला आहे  अन त्यामुळे डोळ्यातून पाणी यावं .....असा काहीसा खोटा अभिर्भाव करत त्या टिपूसचा क्षणांत शेवट त्याने  रुमालाने केला .....
त्याने काढलेला चष्मा लावला .....
इकडे तिकडे हळूच कटाक्ष टाकला ....
टेबलावर पडलेला चेक हातात घेतला ....
Pay....रकान्यातलं नाव परत वाचलं मिस.मिलन भगत ....." नातं " अनाथ आश्रमाच्या संचालिका ज्यांनी या हातांना शिक्षण देऊन अनेक बँकेतले ऑफिसर घडवले होते ...
एन्ट्री मारण्यासाठी हात कि-बोर्ड वर सरकतच होता ....तोच त्या बँकेच्या सॉफ्टवेर च्या लॉग इन चा टाइम आऊट झाला ....
ते प्ले बॅक मध्ये वाजणार मोबाईलमधलं गाणं देखील बंद झालं होतं ....
त्या चेकवरचं नाव त्याने परत एकदा वाचलं .....
तो थांबला त्या नावाची ....आणि त्या नांवासोबतच्या आठवणींची जुळवाजुळव करू लागला .....
.......
...............त्या टिपूसाच्या झालेल्या विभागानी  प्रमाणे ...
..
आणि अचानक ऑफिसातली शांतता भेदावि तसा कोणाचा तरी मोबाईल वाजला ...आणि परत तेच गाणं वाजलं  ......मेरी माँ .....ममा .....

- टिपूस
लेखन / शब्दरचना / संकल्पना
-@©® कृणाल चिलप 14/09/2018

Friday, May 3, 2013

परीक्षेची पहिली आणि शेवटची रात्र ….



अरे, उद्यापासून पेपर चालू होत आहेत 
अभ्यास झाला का ?
नाही रे,"तुझा झाला का?
कसल, काय?"अजून बुक पण नाही उघडली
."सोलिड वाट लागणार आहे ….बाय द वे ,"तुला सेंटर कुठल आल?"
माझ सोड, तुला कोणत आल ते सांग ?
चल भाय तु तर आपल्याच बरोबर आहेस फिकर नॉट आपण manage करू सगळ अशा हवेतल्या काही फुशारक्या.
अस काहीस बोलत आपल्या शाळे पासून कॉलेज पर्यंतची प्रत्येक परीक्षा चालू होते. मग , सोशल साइट वरून महत्वाचे importance शोधन,ग्रुप मध्ये चर्चा,एकमेकांना फोनाफोनी करून तर कधी नाईट मारून अभ्यासाला सुरुवात होते.हे कर हा हे लास्ट टाईम आल होत आता परत चान्सेस आहेत.तो दहा मार्क्स चा प्रश्न येणारच येणार तो करून जा बाकी ठोक सगळ मनाच. अशा गप्पा पेपरच्या आधी रंगतात आणि पेपरला सुरुवात होते.पेपर हातात कि सगळ काही वेगळ वाटत एकमेकांच्या चेहेर्याकडे बघत पेपर लिहायला सुरुवात होते.वाचलेलं सगळकाही विसरलेल असत आणि मग उत्तर लिहिणारा स्वतःच त्या विषयाचा ऑथर {लेखक} बनतो आणि उत्तर लिहायला सुरुवात होते . कसाबसा पेपर पूर्ण होतो.नंतर पेपर संपल्यावर चर्चा "शिट,यार १० मार्कचा पेपर राहिला माझा" . "मला वाटल होत ते येईल पण केल नाही यार" …"मला तर पहिले वाटल कि पेपरच पोर्शनच्या बाहेरचा आहे लिहिला कसाबसा ".सोड ना अरे बाकीच लिहिल ना… भरलास ना पेपर मग तर पास होऊनच जाशील. आणि नाहीच झाला तर भेटूच कि के.टी . exam la .पण उद्याचा जर सिरीयसली करायला पाहिजेहा तो विषय जर अवघड आहे. 
पण ब-याच कॉलेजीयन्सच्या ;लाईफ मध्ये अभ्यास बाबत सिरियस हा शब्द कधी येताच नाही. रात्री नाईट मारायला बसल कि झोप लागते आणि मोबाइल वर आलाराम लाऊन अभ्यासाचा प्लान सकाळी पोस्टपोन होतो.आणि सकाळी उठल कि आता काय वाचायचं ? यात सारा वेळ निघून जातो. पहिल्या पेपरचा आधल्या रात्री सारख्याच दुसर्या, तिसर्या …. पेपरच्या रात्री सरतात….लवकरात लवकर संपावीशी वाटणारी परीक्षा संपते आणि वेकेशन मध्ये उनाडक्या करायचे प्लान तयार होतात.नंतर रिझल्ट लागतो …क़े.टी. लागते … कधी फस्ट क्लास पण भेटतो आणि ते वर्ष संपत … नेक्स्ट सेमला अभ्यास करायचा हा अशी आश्वासन एकमेकांना आणि घरच्यांना देत पुढच्या वर्षाच कॉलेज देखील चालू होत.
पण, लास्ट इयर च्या लास्ट सेमच्या परीक्षेला हे चित्र तसच असत अगदी जस च्या तस पण ते सगळ शेवटच… तो शेवटचा अभ्यास …. तो शेवटचा बेस्ट लक चा मेसेज …. रात्री झोप लागते म्हणून थर्मास मध्ये भरून ठेवलेल्या चहाचा तो शेवटचा कप आणि अभ्यासात जागवलेली ती शेवटच्या पेपरची शेवटची रात्र.हसत-रडत, दंगा-मस्ती करत कॉलेजची तीन वर्ष हसत संपलेली असतात.त्या रात्री नंतर कोण अभ्यासासाठी जागणार नसत."रात्री दोन पर्यंत तरी बसा अभ्यासाला, वर्षभर काही केल नाही आता तरी करा." अस कोण बोलणार नसत कारण ते सगळ शेवटच असत.
पेपरच्या आधी चहाच्या टपरीवर लवकर येउन केलेला अभ्यास, स्वत:हाच पुस्तक सोडून दुसर्याच्या पुस्तकातडोकाऊन केलेला तो अभ्यास आणि शेवटच एकमेकांना केलेल ते बेस्ट लक.
त्या शेवटच्या पेपर सारख सार काही संपत. ते अभ्यासच आश्वासन,टपरीवरचा चहा,सगळ्यांनी एकाच वहीत केलेला अभ्यास आणि कधी कधी पेपर लिहिण्यासाठी मागितलेला तो उधारी वरचा पेन.
शेवटच्या पेपर मध्ये लिहिलेल्या शेवटच्या वाक्याचा पुर्विराम सगळ्यालाच पूर्णविराम देऊन टाकतो. या वेळेस पुढची सेम अभ्याससाठी नसते आणि उद्या अभ्यास करून येऊ अस आश्वासन पण नसत कारण त्या वेळेस चालू झालेला असतो तो खरा जीवन प्रवास.… एक "रेस" जिथे मित्र नसतात नातेवाईक नसतात…तिथे असतात ते फक्त कॉमपेटिटर्स .त्यात धावणारे असतात पडणारे असतात कधी सावरणारे पण असतात पण जो तो धावत असतो ते फक्त स्वतः जिकण्यासाठी.आणि या स-यात आठवणीत राहिलेली असते ती फक्त परीक्षेची शेवटची रात्र.

-नकळत
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]  

Monday, April 8, 2013

खरचं वाटत यार तिने मला कधीतरी असं अचानक भेटावं..........


खरचं वाटत यार तिने मला कधीतरी
असं अचानक भेटावं..........
त्याच वेळी कसं आकाशात आभाळ दाटावं...
आणि तिने माझ्या सोबत चालावं
मी तिच्या डोळ्यात अन् ,
तिने माझ्या डोळ्यात कसं निरंतरा पर्यँत पहावं...

बाजाराच्या ठिकाणी तिने आई सोबत यावं..
आणि माझ्या आतुरलेल्या नजरांना 
 तिने  हळूच असं पहावं.....
त्या गर्दीचा फायदा उठवत ,
मी ही तिच्या बाजुला जाऊन
कसं फुला सारखं उभ रहावं ...
तिने माझ्या हातांना नकळत स्पर्श करताना
हळूच कसं लाजावं...
खरचं वाटत यार तिने मला कधीतरी असं अचानक भेटावं....
तिच्या अचानक भेटण्याने
 माझ्या शब्दांनी कसं मुक होऊन जावं.....
त्या नजरांच्या झरोक्यात पुढचं संभाषन व्हाव.
त्या नजरांच्या भाषेत एखादं वाक्य अडावं
तिने नकळत हसून हळुच असं लाजावं...
खरचं वाटत यार तिने मला कधीतरी असं अचानक भेटावं.....
त्या रीमझिमना-या पावसात
तिने त्या नेहमीच्या झाडाखाली आडोशाला भेटावं
हळूच येऊन माझ्या शरीराला खेटावं...
त्या रीमझिना-या पावसात
त्या वा-याने कसं संथपणे अंगावरुन जावं
तिच्या अंगावरही शहार यावं...
तिने काय आणि मी काय त्या प्रेममिलनात धुंद होऊन जावं...
खरचं वाटत यार तिने मला कधीतरी असं अचानक भेटावं...........
खरचं तिने अचानक भेटावं...........


-नकळत
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k] 

Saturday, April 6, 2013

तिचा स्पर्श म्हणजे एखाद्या वा-याच्या झुळके प्रमाणे व्हायचा …

आज तिच्या सोबत खूपच आनंद आला…
....
....
तिच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळी चाहूल होती …. 

....
...
जेव्हा ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवायची…….
माझा  हात.... ती,  स्वत:च्या  मिठीत गच्च पकडायची……….
माझ्या बोटांमध्ये तिची बोट अलगत पणे
घट्ट गुर्फटायची……… 
इतकी घट्ट कि त्या स्पर्शातच सार  काही समजायचं ……
अगदी सार काही ……
आमची भेट व्हायची तेव्हा फक्त तीच बोलायची ….
मला कधी बोलताच नाही आलं ….
माझ लक्ष असायचं ते फक्त ते तिच्या निरागस डोळ्यानं मध्ये…
ती बोलताना मला हसायला यायचं ……आणि आजही येत …. 
मी हसायचो आणि मग ती बोलायची, "का, हसलास रे ?"…….
मी बोलायचो,"माहित नाही" ….
खरच मी का हसायचो किंवा का हसतो मला खरच नाही माहित ……………
मग ती रुसायची ….
ती रुसलेली असताना खूप छान दिसायची   
….
तिचे ते नाजूक  डोळे बारीक करायची ……… 
नाकावर राग आला कि तीच ते छोटास नाक लाल व्हायचं ……
आणि मग ती माझ्याच शर्टाला नाक पुसायची ……
तिचा स्पर्श म्हणजे एखाद्या वा-याच्या झुळके प्रमाणे व्हायचा …
स्पर्श जाणवायचा पण अस्तित्व नाही ….
………….
………… 
तसं तिचं  अस्तित्व मला कधी प्रत्येक्षात अनुभवायलाच नाही भेटलं …. 
………. 
…….
ती माझ्या आयुष्यात नाही…
… … 
नव्हती ….
कधीच नव्हती …
होता तो फक्त आभास ….  
… 
… 
आमची भेट म्हणजे ………
एक कल्पना……
ती ही  काल्पनिक कल्पना  ….
आज हि मला ती भेटते ……….
माझ्या समोरच असते ती ……
पण एकदम गप्प गप्प ….
तिचे फक्त डोळेच बोलतात …. 
एका चुकार शब्दाचाही संवाद नाही ……


आजही तिला स्पर्श करावासा  वाटतो …
पण मोबाईलची स्क्रीन आडवी येते … 
…. 
ती म्हणाली मला विसरून जा …. 
अगं ,प्रेम करतो ग तुझ्यावर …… अजून किती राग करणार ?
अजून किती काल्पनिक भेटी करायच्या ?
आणि मनाची समजूत घालायची ?
आजही फक्त तुझा फोटो पाहूनच तुझ्याशी गप्पा मारतो ….
आणि काल्पनिक तुझ्या अस्तित्वाचा खेळ मांडतो….  
सत्यात ये कधी तरी ….
मी अजूनही तिथेच आहे …
तुझी वाट पाहत उभा ….
त्याच वळणावर जिथे मला तू पहिल्यांदा दिसली होतीस …. 

-नकळत
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]  

Friday, March 29, 2013

रडू न्हगं रं लेकरा by-- आशित साबळे.


रडू न्हगं रं लेकरा by-- आशित साबळे.


म्या बा शेतमजूर मालक,
काहीतरी करून खाईन...
येका तरी येळची भाकर,
पोटासाठी लई व्हईन...
दुस्काळानं हिंडतो गावागावा,
कुनीतरी तरी घोटभर पानी द्यावा,
कोरड पडली जल्माला,
घसा तरी वला करून परत जाईन...

रडू न्हगं रं लेकरा,
जे डोळ्यात हाय, ते बी सुकून जाईन...
बगा बगा व लेकरू माझं,
चिरकुन घसा कोरडा पडलाय,
डोळ्यातून पानी येईना झालं,
म्हनत आसन तितकं तरी चाटायला व्हईन...

तिकडं म्हनं हजारो लिट्राच्या पिचकाऱ्या उडीवतेत,
कुनीतरी घेऊन चला ना तिकडं,
धर्माच्या नावावर का व्हईना, खोटारडे जमतेत तिकडं,
म्या बी निसर्गानं दिलेलं पानी पिईन...
लाजा वाटान्हात त्यान्ला, हिकडं काय झालंय ते म्हाईत न्हवं का,
वाटलं न्हवतं आमचंच खाऊन आमच्यावरच उलटे व्हतीन...

लय भ्याव वाटतंय गुरांचे सांगाडे बघून,
गावाकडं शिरप्या माझा काय म्हनीन...
जित्ता जातोय का घरला ते बी ठावं न्हाय,
कुनाला म्हाईत आता आमचं काय व्हईन...


- आशित साबळे