Saturday, March 16, 2013

..ती गेली अन ...

...ती गेली अन ...
दारातल्या वृन्दावनाने आशीर्वाद
देणे बंद केले
घरातल्या पोरांनी शुभंकरोती म्हणणे
बंद केले
ती गेली अन ...
पहाटेने भूपाळी म्हणणे बंद केले..
तिन्हीसांजेने सांजवात करणे बंद
केले ...
ती गेली अन...
अंधार्या राती वाट शोधणे बंद झाले
आणि धडपडल्यावर मायेचा पदर शोधणे बंद
झाले ..
छान छान कुशीत शिरून घट्ट झोपणे बंद
झाले
अन
अंगणातूनच "आई आई ! " ओरडणे बंद झाले
ती गेली अन...
आम्हीच घराला "घर" म्हणणे बंद केले

THIS IS NOT MINE

No comments:

Post a Comment