Sunday, March 17, 2013

मी तुझ्यावर आज हि तितकंच प्रेम करतो …

मी तुझ्यावर आज हि तितकंच प्रेम करतो … 
कदाचित तुला प्रेम म्हणजे की हे कधीच उमगले नाही … 
मी काही न बोलता उगाच तुझ्यावर प्रेम करत राहिलो का ?
मला आजही फक्त तू हवी आहेस.…. 
किमान एकदा तरी बोलून बघ… 
किती दिवस तू हा असा अबोला धरून बसणार ?
एक वर्ष …. एक महिना…. एक दिवस.… 
यापेक्षा हि खूप कालावधी लोटला आता…. 
रुसवा,फुगवा  सोडून भेट एकदातरी… 
मला आयुष्यात फक्त तू हवी आहेस बाकी काहीच नको… 
मी प्रेम केल ते त्या निरागस डोळ्यांवर….
मी प्रेम केल त्या नाजुकश्या ओठांवर .…
…. 
……. 
………
अस. मी कधीच नाही बोलणार  
कारण,मी तुझ्या मनावर प्रेम करतो बाकीच्या गोष्टी तर खूप थिल्लर आहेत.….
तुला एकदा शेवटच भेटेन म्हणतोय …. 
कदाचित माझ्या नशिबात आणि हृदयात
या मध्ये फक्त एवढाच फरक आहे
जो ह्रदयात आहे,
तो नशिबात नाही ...
आणि....?
जो नशिबात आहे 
तो ह्रदयात नाही .....
पण जरी माझ्या नशिबात नसलीस तरी  माझ्या ह्रदयात तुझी जागा कोणी घेऊ देखील शकणार नाही…
आणि मी ती कोणाला देणार ही नाही… 
प्रेम हा काही भातुकलीचा खेळ नाहीये कि आपल्या मर्जी नुसार सगळ बदलत रहाव…
मी तुझ्यावर प्रेम करतो आणि कायम करणार… 
नाही तरी जीवनात हवी असलेली व्यक्ती आणि स्वतः ला पडलेल्या प्रश्नांची उत्तर कधी सापडतच नाही ….  
विचारातून काढलाय केव्हाच तुला
पण माझ्या काव्यातून तू जात नाही
काळजात बसली तू अशी कि
तुजा चेहरा क्षणभरही नजरेआड होत नाही..!!!!!
तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही.....

-मनाची वेदना [कृणाल चिलप(K.K.) ]  

1 comment: