Sunday, December 25, 2011

लेक्चर मध्ये न करण्याच्या गोष्टी...........

>लिहून घेऊ नये
लेक्चर चालू असताना लिहून कधीच घेऊ नये कारण,नंतर वही पुर्ण करताना पाहून घरातल्यांना व शिक्षकांना वाटतं की पोरगा अभ्यासाला लागला म्हणून .

> लक्षं कधीच देऊ नये
लेक्चर चालु असताना लक्ष कधीच देऊ नये कारण टिचरला लेक्चर नंतर डाऊट विचारल्यावर बरं वाटतं

>मोबाईल मध्ये एकटकं पाहू नये
लेक्चर मध्ये मेसेज टाइप करताना किंवा वाचताना एकटकं मोबाईल मध्ये पाहू नये कारण टिचरच्या मनात शंकांचे घोडे दौडू लागतात.

> शांत बसु नये
बोर लेक्चर मध्ये शांत कधीच बसु नये दहा मिनीटांतुन एखादी तरी कमेंट योग्य वेळेस पास करावी कसं आहे ना महोल हसता खेळता असल्यावर मज्जा येते आणि आपलं डिमांड पण वाढतं.

>अभ्यासाची चर्चा करु नये
लेक्चर चालु असताना टिचरशी अभ्यासा व्यतीरिक्त गोष्टींवर चर्चा करावी त्यांची मत जाणून घ्यावी तेवढाच लेक्चर मध्ये टाइम्पास

>अगाऊ पणा करु नये
खडुस टिचरच्या लेक्चरला मोबाईलवर बोलण्याचा किंवा कमेंट पास करण्याचा अगाऊपणा करु नये असे स्टंट ब-याचदा अंगावर येतात व त्याचा खुप त्रास होण्याची शक्यता देखिल असते.

>एकमेकांकडे बघणं टाळावं
लेक्चर चालु असताना आपल्याला बोलण्याचा रोग प्रत्येक मुलामुलींमध्ये दिसतो.
तेव्हा बोलताना एकमेकांकडे पाहू नये. आपण बोलतोय हे टिचरच्या लगेच लक्षात येतं.

>हसू नये
लेक्चर मध्ये कमेंट पास केल्यावर कधीच जोरात हसू नये यव्हाना टिचरच्या डोळ्यात डोळे घालून कधीच पाहू नये. निर्लज्या सारखं मागे वळून पहावं आणि त्याला बळीचा बकरा बनवावं.

>हजेरी घेण्याच्या वेळेत गप्प बसु नये
लेक्चरच्या आधी टिचर हजेरी घेत असताना आपला नंबर झाल्यावर बोलण्यास व दंगा करण्यास सुरुवात करावी त्यामुळे 10 ते 15 मिनीट चांगला टाइम्पास घडू शकतो.

>उलटं बोलणं टाळावं
लेक्चर मध्ये कोणतीही घटना झाल्यास टिचरशी मोठ्या आवाजात किंवा त्यांना उलटं बोलु नये आपल्या इंन्टरनल मार्कस वर त्याचा रागरतन उमटण्याची शक्यता असते. आणि चुकी नसल्यास शांतपणे नम्र होऊन बोलणी करावी.

>वही कधीच बंद करु नये
लेक्चर मध्ये आपली वही कधीच बंद करु नये टिचरला आपण अभ्यास करतोय आपलं लक्षं आहे असे झालेले गैरसमज आपल्यासाठी चांगले असतात.

 

घरी असताना घरच्यांचं महत्व कधी कळलंच नाही..........!!

घरी असताना कधी घरच्यांचं महत्व कळलंच नाही
आज मात्र क्षणोक्षणी त्यांचीच आठवण येते........
अन डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही

नेहमीच असा वाटायचं कि घरापासून लांब जावं
... थोडसं आयुष्य स्वतः च्या पद्धतीने जगावं
आजही तो दिवस स्मरणात आहे
जेव्हा पहिल्यांदाच शिक्षणासाठी घराबाहेर आलो

नवीन कॉलेज,नवीन मित्र ....,सार काही नवीन होतं
या मायानगरीत मी हरवणार तर नाहीना असच नेहमी भासत होतं

दररोज आईबाबांचा फोन यायचा
अन पहिला प्रश्न हाच असायचा " तिकडे सर्व ठीक आहे ना ?"
मीही फक्त "होय" म्हणायचो अन डोळ्यात आलेले अश्रू चटकन सावरून घ्यायचो
पण माहित नाही आईला कसं काय कळायचं
ती मला लगेच विचारून घ्यायची "तुला काही त्रास तर नाहीना"
मी म्हणायचो छे छे "त्रास"........ नाही माझा जरा घसा बसलाय

मी खोटं बोलतोय हे आईलाही कळायचं फोनवर बोलताना हृदय तिचही गहिवरून यायचं
चटकन मग "बाबा" आईकडून फोन घ्यायचे
अन मला धीर देवून......."इकडे सार काही अगदी व्यवस्थित आहे
तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे आणि स्वतः ची काळजी घे "असं सांगायचे

आज मी घरी अधूनमधून जातो पण पाहुणा म्हणून
अन लगेच परत निघून येतो कॉलेज असतं माझं म्हणून
खरच आता नकोसा झालाय हा एकटेपणा अन हे शिक्षण
नेहमीच घरच्यांची आठवण येते नकोसा वाटतो क्षणक्षण

घराबाहेर टाकलेलं हे पाउल म्हणजे यशसंपन्नतेच शिखर
गाठण्यासाठी केलेली वाटचाल कि शिक्षा हेच मला कळत नाही
खरचं....घरी असताना घरच्यांचं महत्व कधी कळलंच नाही..........!!

Tuesday, May 24, 2011

कधीतरी वाटतं यार……

कधीतरी वाटतं यार……
 ह्या खांद्यावर डोकं ठेवून,
तिला रडावसं वाटावं,
काँलेजनंतर मागे थ.ंबून,
सोबत बसावसं वाटावं,

ज्या स्वप्नांमधे माझ्या,
सगळ्या रात्री जागतात,
त्या स्वप्नांमधे हरवून,
तिलाही जागावसं वाटावं,

माझे आसू पुसून तिनं,
आमच्या सुखात हसावं,
कधीतरी वाटतं यार,
आपलंही कुणीतरी असावं,

छोट्या छोट्या गोष्टींमधे,
खोटं खोटं चिडावं,
पण, भेटीनंतर निघते म्हणताना,
तिचं पाऊल अडावं,

बाकी सगळ्या जगाचा,
पडेलच विसर तेव्हा,
तिनं माझ्या प्रेमात,
अगदी आकंठ बुडावं,

ह्या छोट्याश्या स्वप्नानं,
एकदाच खरं व्हावं,
नेहमीच वाटतं यार,
आपलंही कुणी असावं!!!!

Sunday, May 1, 2011

मराठी मराठी मराठी.......

मराठी, मराठी माणूस आणि महाराष्ट्र....
         आजकालचा Hot topic, अक्षरशः ज्वलंत विषय!
काय काय चालतं या विषयाच्या विजावर, देवच जाणे! मग कोण आहे हा मराठी माणूस? जो महाराष्ट्रात राहतो तो?  जो महाराष्ट्रात जन्मला तो? जो इथली माती आपली मानतो तो? जो महाराष्ट्रच देण लागतो तो? की जो "जय भवानी" म्हणाल्यावर "जय शिवाजी" म्हणाल्याशिवाय राहत नाही तो?
          अरे, हे सर्व महाराष्ट्रीय. हे सगळे महाराष्ट्राला मानतात, पण जोवर हे मराठीत बोलत नाहीत तोवर हे मराठी नाहीत! खरा मराठी तोच जो चारचौघात न घाबरता, न बुजता, ताठ मानेने, अभिमानाने "अमृताहूनही पैजा जिंके" या  ज्ञानेश्वरांच्या शब्दांचा गर्व बाळगून मराठी बोलतो; आणि स्वतःला फक्त महाराष्ट्राचाच नाही तर या देशाचा ॠणी मानतो...
 शिवरायांचे,
“ भाषा गेली की स्वाभिमान गेला,
स्वाभिमान गेला की धर्म गेला,
धर्म गेला की राज्य गेले,
आणि राज्य गेले की स्वातंत्र्य गेले!”
हा उपदेश ध्यानी ठेऊन मराठीपण जागवायला आणि वाढवायला कधीही पुढे सरसावतो.
            आपण भारतीय अत्यंत गतवैभवशाली आहोत, मराठी माणूसही काही त्याला अपवाद नाही; उलट त्यातही थोडा पुढेच आहे.मराठी माणूस  कायमच देशासाठी, स्वकीयांसाठीच नव्हे तर उचित गोष्टींसाठी लढला वेळोवेळी मोडला पण पुन्हा ठाम उभा राहिला तो "सत्य आणि उचित गोष्टींसाठीच, धर्मसाठी... "
          शिवराय हे अवघ्या मराठी जनांचे आराध्य  दैवतच. शिवराय हे मराठी माणसाच्या हृदयाच्या इतक्या जवळ आहेत की आपण त्यांना कधीकधी आप्तेष्टानं सारखे एकेरी संबोधतो,''शिवाजी होता म्हणून, शिवाजी या गडावरून त्या गडावर गेला" असा म्हणतो. हा माज नाही, हे प्रेम आहे. आपण आईला नाहीका एकेरी हाक मारत?
पण एवढे काय केले त्यांनी? याच शिवरायांनी  "मराठी माणूस" ही व्याख्या बनवली. अविरत, उत्तुंग अशी पूर्वापार आलेली पण विखुरलेली तत्वे एकत्र सांधली आणि शुन्यातून स्वर्ग निर्माण केला. पहिला मराठी शब्दकोश  बनवला आणि मराठीला राजाश्रय दिला. त्यांनी दिलेल्या पाऊल खुणांमुळेच देशासाठी मारणारा प्रत्येकजण भारतीयाच असला तरी पहिला मराठीच होता.
आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके,आझाद हिंद सेनेत भारती होणारे जपानमधील मराठी रेजिमेंटचे सैनिक,स्वातंत्र्यानंतर लगेचच पाकिस्तानी घुसखोरांना तुटपुंज्या
सैन्यासह अडवून धरणारे कर्नल शिंदे.... सर्व  मराठीच होते. एवढेच नव्हे तर अगदी मध्ययुगात जेव्हा सुलतान अब्दालीने पुन्हापुन्हा आक्रमणे करून संपूर्ण भारताला त्रस्त करून ठेवले होते तेव्हा पानिपतावर याच मराठीतील दीड लाख बांगडी फुटली, हिऱ्या-मोत्यासारखे असीम योद्ध्ये गेले ते  या देशासाठीच. मराठे युद्धही हरले पण सुलतानाच्या फौजांचे कंबरडे असे मोडले की तो सुलतानही या शौर्याने दिपून गेला, नतमस्तक झाला आणि पुन्हा कधी भारताकडे वाकड्या नजरेने बघितले नाही. पण एवढ्यावरच हार मानून किंवा निराश होवून मराठी डगमगला नाही, तर आपले सर्वस्व गमावलेले असतानाही नव्या हिमतीने, नव्या नेतृत्वासह मोठ्या जोमाने त्याने तयारी केली आणि पुन्हा अख्खा हिंदुस्तान अगदी अफगाणिस्थानातील अटकेपासून परत आपल्या ताब्यात घेतला आणि सर्वप्रथम भारत एकछत्री अंमलाखाली आणला, अगदी काश्मीरसह.( इंग्रजांनी नव्हे!)
        तर असा हा दृढनिश्चयी  लढवय्या मराठी माणूस...मराठी माणसाच्या कातृत्वाचे तेज फक्त रणांगणापर्यंत मर्यादित नाही, तर आज प्रत्येक महत्वाच्या  क्षेत्रात त्याने बाजी मारली आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात मराठी जनांनी कायमच भरभरून योगदान दिले आहे. अगदी बाराव्या शतकात ज्ञानेश्वारनी अवघ्या सोळाव्या वर्षी अनंत काळाचे सत्य व व्यवहारज्ञान सर्वसमान्यांसाठी सोप्या शब्दात मांडले.एकोणीसाव्या शतकात टिळकांनी पुन्हा याच गीतेचा आधुनिक यथार्थ अर्थ लावला. अशी किती उदाहरणे द्यावी तितकी कमीच आहेत. साहित्य , कला , विज्ञान, क्रीडा यासारखी क्षेत्रे स्वातंत्रसूर्य वीर सावरकर , सूरसम्राज्ञी लतादीदी, स्वरश्रेष्ठ भीमसेन जोशी, दादासाहेब फाळके, पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे, जयंत नारळीकर, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांनीगाजवली आहेत आणि ही नामावली वाढतच जाणारी आहे.
          मग असा हा अष्टपैलू, सर्वक्षेत्रे पादाक्रांत केलेला मराठी माणूस वादातीत का? का कधीकधी या मराठी माणसाला नाझी वृत्तीची ओढ वाटू लागते? का इतरांना तो आपल्याच माणसांचे पाय खेचताना दिसतो? का काही मराठी नेते आपल्या धडाडीच्या नेतृत्वाने मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलवतात तर काही राजकारणी त्यांच्या तुच्छ कृत्यांनी मराठी वैभवाला लांछन लावतात? का आपल्याला असं वाटत की शिवाजी शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा? भारतीय लष्करात कित्येक शूर मराठी सैनिक असताना का २६ नोव्हेंबरला परप्रांतीयांना या मराठी मातीसाठी हौतात्म्य पत्करावे लागते? का?!...
         जेव्हा ताकद आणि बुद्धी यांचा संगम होतो तेव्हा जशा अत्युत्तम गोष्टी घडतात त्याचप्रमाणे नकोते तापदायक फाटेही फुटू शकतात...अनेक बुद्धिमान जेव्हा एकत्र विचार करू लागतात, एकाच कार्यात लक्ष घालू लागतात तेव्हा ते काम बिघडण्याचीच शक्यता जास्त असते; तसे होत असेल कदाचित मराठी माणसाच्या बाबतीत. आजच्या घडीला मराठी माणूस आपली ताकद, बुद्धी काही चुकीच्या व भ्रष्ट माणसांकडे गहाण टाकून आलेला दिसतोय. दुर्दैव हे की ही नतद्रष्ट्र माणसेही मराठीच आहेत!
          आज पुन्हा आपलीच माणसे आपल्याच माणसांना धोका बनली आहेत. आज पुन्हा नको तो इतिहास स्वतःला गिरवायला निघाला आहे, काही शहाणे अजून पुढे जाऊन इतिहास घडवण्याऐवजी बदलायला निघाले आहेत..."रायगडला जेव्हा जाग येते" या नाटकाच्या शेवटी वसंत कानेटकरांचा एक धीरगंभीर आवाज नाट्यगृहात घुमतो, मन हेलकावून टाकतो. ते म्हणतात,
                                  "इतिहासाच्या गालावरुनी जिथे एकदा सुकले ओघळ.
                                  स्त्रवू लागले शतधारांनी... पुन्हा एकदा तिथेच ओघळ;
                                  त्या शतधारा अनामिकाच्या मनी घालती पिंगा,
                                  शिवरायांच्या हृदयांतरीचे... शल्य मला सांगा;
                                                                      शल्य मला सांगा! "

Tuesday, April 26, 2011

मी.माज़ा न राहिलो

मी.माज़ा न राहिलो
प्रेमात तिच्या पुरता बुडालो
तिला कधी हे कळलेच नाही
माज्या भावना तिच्या पर्यंन्त
कधी पोहोचल्याच नाहीत
हे मला खूप उशिरा कळले
ज्या दिवशी मी तिला Propose
करण्याचे ठरवले
त्याच दिवशी मला कळले
she has already one boy friend
मी पुरता हबकलो
आठवणीँच्या जाळ्यात गुरफ़टुन गेलो
तिला तिच पहिल प्रेम मिळु दे ,
म्हणुन मी केला त्याग
माज़्या प्रेमचा
ती त्याच्या सोबत सुखात राहो
हीच ईश्वराचरणी प्रार्थना
आता मी एकटा आहे
तिच्या आठवणीँच्या सोबतीने जिवन
जगतो आहे
हे जिवन खूप मोठ आहे
हि तर नुकतीच सुरवात आहे
आता मी
मला तिचा Brother मानत असलो तरी
ती परत येईल अशी वेडी आस धरुन आहे
ती "April Full" करते आहे याची पुर्ण
कल्पना आहे

Tuesday, March 29, 2011

एकदा काँलेज मध्ये प्रेम मलाही झालं होतं ...

एकदा काँलेज मध्ये प्रेम मलाही झालं होतं ...
माझ जीवन बहारलं होतं..
तिच्या निरागस डोळ्यांमध्ये जसं स्वर्ग ऊतरलं होतं ...

तिच्या शांत स्वभावात
शांत आकाशाचं अस्तित्व दाटलं होतं ...
जणू दुरवर असलेला ध्रृवताराचं असं माझ्या खुळ्या मनाला वाटलं होत..

तिच्या हसण्याने माझं मनचं घायाळ झाले...
माझ्या साठी तिचे शब्द अमृत तर माझे शब्दचं मुके झाले...

जागामध्ये भरकटणार मनं
आता काँलेज मध्ये भरकटु लागलं वर्ग असोवा कँटीन तिचाच शोध घेऊ लागलं

तिच्या मुळे प्रेमाला अर्थ होता कारण तिच्या साठीचं
KK मधला कवी हरवला होता...

शब्दांनी अज्ञात वास घेतला

शब्दांनी अज्ञात वास घेतला तर माझी कविता पोरकी होईल....
तुझ्या त्या लांब जाण्याने माझा ऊर भरुन येईल....

थोड थांबाव म्हणतं असशील तर मी म्हणेल थांबु नकोस...
या धावत्या जगात थांबलास तर जग तुला BYE करून पुढे निघुन जाईल....

तरी ही तु थांबलास मी पुढे जाताजाता तुला बोलवतचं राहील ...

शेवटी जाताजाता तुझ्या कडेचं पाहतं राहील....
पुढे गेल्यावरही .....
माझ्या सोबत एक वेडा कवी देखिल होता हे जगाला सांगत राहील...

आत्मविश्वासाचे पंख

आकाशात उत्तुंग ऊडणा-या
गरुडालाही ढगांचे अडथळे पारकरावे लागतात....

राज्या सारख्या सिंहालाही , अनेक पराक्रम घडवावे लागतात....

पाण्यात पोहणा-या माशालाही लाटांचे मार सोसावे लागतात....

जिवनात पुढे जाणा-यानांच विचारांच्या भेदक नजरा लागतात....

शेवटी प्रश्नांसाठीचं उत्तरे असतात....

कारण,
"आत्मविश्वासाचे पंख कधीच दिसत नसतात."

महाराज आज आठवणं येते तुमची ....

महाराज आज आठवणं येते तुमची ....


स्रीवर नजर ऊठवणा-यांचा जागीच जिव घ्याना..
हा जातीवाद करुन समाजात फुट
पाडणा-या गद्दारांना कडेलोटाची शिक्षा द्याना...


त्या झोपलेल्या मराठी माणसाला तुम्हीचं जागवाना...
पुन्हा या डोळ्यांना स्वराज्याचं गोजिरवान स्वप्न दाखवाना...


राजकारण्यांनी बलात्कार केलेल्या या महाराष्ट्राच्या मातीची परीस्थिती पहाणा...
महाराज विनंती करतो पुन्हा एकदा या धरतीवर याना..
तुमचा आदेश पुन्हा एकदा द्याना..

 
मग बघा ...हे राजकारणी तुमच्या पायावर लोळन घेत म्हणतील,
महाराज अजुन एक संधी द्याना...

पुन्हा एकदा...

पुन्हा एकदा पुन्हा एकदा...
स्री ची माँ समान तुलना होईल...

राजकारण्यांनी विकुन खालेल्या,
 या महाराष्ट्राच्या मातीची तुलना आई समान होईल...

इतिहासाची पान साक्ष देत पुन्हा वरती येऊन..
महाराजांच्या पराक्रमाची किर्ती गायिल..
या पैशांची पुन्हा एकदा राजमुद्रा होईल...

याच डोळ्यांनी पुन्हा एकदा या मातीसाठी,
 गोजिरवान स्वप्न पाहील..
पुन्हा एकदा रायगडावर 22हजारदशलक्ष होनांच,
 सोनेरी शिवसिंहासन स्थापन होईल..


"छत्रपती शिवाजी महाराजकी,जय" ही किंकाळी पुन्हा एकदा,
मराठ्यांच्या मनामनाला, या मातीच्या कणाकणाला ,भेदुन जाईल...
आज पुन्हा वाटतं............
  या मातीत आमच्या शिवबाच्या आधि माँ साहेब जिजाऊंचा जन्म होईल...

असं का वाटतयं ...

आज
मला काहीतरी विसरल्या सारखं
का वाटतयं ?
अथांग आकाशही मोकळं का वाटतयं...
पुस्तकातले शब्दचं हरवलेत असं
का वाटतयं ...
शब्दांमधल्या भावनाही हरवल्यातं असं
का वाटतयं ...
कविता लिहायलां घेतल्यावर विचारातं
हरवल्या सारखं का वाटतयं ...
विचारांमध्ये मन गुंतल्या सारखं
का वाटतयं ...
कुणीतरी नकळतं आपल्याला स्पर्श करुन
जातयं ..
असं का वाटतयं...
त्या स्पर्शाला शोधता शोधता मी त्या स्पर्शातचं
हरवल्या सारखं का वाटतयं ...

छानं ते समोरचं झाडं

छानं ते समोरचं झाडं, त्याच्या झुकलेल्या फांदीवर बसून दोन पाखरं नेहमी किलबिलकरायची...
तुलाही सवयं झालेली त्यांना आपल्यात पहायची..
त्यांच्या सारखंच आपलंही घरटं असावं झाडांच्या फांदीवर झुलणार..
तुझ्या हजार प्रश्नांवर माझं नेहमीच गप्प राहणं..
तुझ्या कडे फक्त केविलवाने पाहणं...
कारण, त्या एका फांदीवरच्या पाखरांच घरटं मात्र एक नव्हतं..
तुझी माझी साथ अशीच होती कारण, ते प्रेम नव्हतं...

मी.माज़ा न राहिलो

मी.माज़ा न राहिलो
प्रेमात तिच्या पुरता बुडालो
तिला कधी हे कळलेच नाही
माज्या भावना तिच्या पर्यंन्त
कधी पोहोचल्याच नाहीत
हे मला खूप उशिरा कळले
ज्या दिवशी मी तिला Propose
करण्याचे ठरवले
त्याच दिवशी मला कळले
she has already one boy friend
मी पुरता हबकलो
आठवणीँच्या जाळ्यात गुरफ़टुन गेलो
तिला तिच पहिल प्रेम मिळु दे ,
म्हणुन मी केला त्याग
माज़्या प्रेमचा
ती त्याच्या सोबत सुखात राहो
हीच ईश्वराचरणी प्रार्थना
आता मी एकटा आहे
तिच्या आठवणीँच्या सोबतीने जिवन
जगतो आहे
हे जिवन खूप मोठ आहे
हि तर नुकतीच सुरवात आहे
आता मी
मला तिचा Brother मानत असलो तरी
ती परत येईल अशी वेडी आस धरुन आहे
ती "April Full" करते आहे याची पुर्ण
कल्पना आहे

माय मराठी

व्हिसा Stamp झाल्यावरती.. एकाच
धावपळ उडून गेली
भवितव्याच्या स्वप्नांनी रे ..तहान
भूक हरवून गेली ...
भेटी झाल्या ,खरेदी झाली ..ब्याग
सुद्धा भरून झाली
सारख्या सूचना देता देता ..आईची धांदल
उडून गेली ..
तासामागून तास गेला ..आणि flight
ची वेळ जवळ आली ..
निरोप द्यायला विमानतळावर..
सवंगडयानी गर्दी केली ..
कौतुक
आणि काळजी तुझ्या बाबांच्या ..चेहऱ्यावर
दिसून गेली ...
पाठ
फिरता तुझी ..त्यांची पापणी सारं
बोलून गेली .
आरे आपली माती.. आपली माणसं , देश
आपला विसरू नको .!
विमान उडालं जेव्हा एकेक डोळा..
पाण्याने भरला असेल .
अगदी अखेरच्या क्षणी मित्रा..
मनानं बंड केलं असेल .
नकोच जायला परदेशात.. एकदा नक्कीच
वाटलं असेल .
आरे आकांक्षाच्या पंखानाही..
अश्रुनी जखडून टाकल असेल .
लिंकन चे शब्द आठव ...अश्रू
ढालायाची लाज वाटू देऊ नकोस .
गीतेमधला उपदेश आठव... हात पाय
गाळून बसू नकोस .
अरे अटकेपार झेंडे लाव ..पण माय
मराठी विसरू नकोस .!
अरे अन्न दिले , वस्त्र
दिले ....सह्याद्रीने ओसरी दिली .
आई - बापाने कष्ट करून ...भरून
ज्ञानाची शिदोरी दिली .
गुरुजनांनी संस्कार दिले ..
गावकर्यांनी यारी दिली .
अरे टपरीवरच्या अप्पाने ने हि..
वेळो वेळी उधारी दिली .
देश सुटला , पोटासाठी ...बंध इथले
तोडू नको .
पोटासाठी मित्रा ..दहा दिशांनी जायला हवं.
दिशा देण्या प्रवाहाला ..प्रवाहापुढे
पाळायला हवं .
कासवासारखा विश्वासान.. एकेक पावूल
टाकायला हवं .
अरे
आठव्या घरच्या प्याद्यासारखा ..वजीर
म्हणून जपायला हवं.
एखादा स्वप्ना देशासाठी..
आपणही पहिला हवं
वेवसिकतेच्या दुनियेत या..
भावनांना हि जपायला हवं .
नमस्कार सांग लिबर्टीला.. पण
आईभवानी विसरू नको .!
स्वर्ग सुख सगळी मित्रा हात जोडून
उभे असतील .
भुरळ पडतील तुला अन मग
मर्यादेला हसत बसतील .
जिम असेल . क्लब असतील ,
मैदानेही भरत असतील .
मंद मंद उजेडात
कुठेतरी पार्ट्या सुद्धा होत
असतील .
रॉक अन्ड रोल वर बेभान हो ...पण स्वर
लताचा विसरू नको .!
पंखात शक्ती आल्यावर पाखर ..दुवर
उडून जातात .
आई -वडिलांच्या घरट्यात मग..
आठवणींची भूत राहतात .
अरे आठवणींची भूत ..रोज आईला भेट
देतात .
स्वप्नात भेटेल तुला तर तिची झोप
सुद्धा पळवून नेतात .
आईच्या चरणी परत ये स्वप्नात
सुद्धा रमू नको .!
वाट पाहत मित्र तुझा ...पानपट्टीवर
थांबला असेल .
मग तुझ्या वाटणीचा ग्लास
कुठेतरी ..पार्टीत तसाच उरला असेल .
ब्याट घेऊन पिंट्या ....एकटाच
मैदानात उतरला असेल .
तुझ्याविना संघ महाद्या .... फायनल
म्याच हरला असेल .
अरे
भेटीसाठी तुझ्या ...इथला प्रत्येकजण
आतुरला असेल .
आणि आठवणीनी गावच्या कधीतरी...
तुझाही उर भरला असेल .
भरारी मार उंच आकाशी ..पण
मातीशी नातं तोडू नकोस .!
आईची ती माया आठव ...तू फक्त परत ये .
वडिलांचे अश्रू आठव ...तू फक्त परत
ये
मनमोहनसिंग चे शब्द आठव.....तू फक्त
परत ये .
अब्दुलकलाम चा विश्वास आठव ...तू
फक्त परत ये .
पहिली ब्याटींग तुझी मित्रा...तू
फक्त परत ये .
अप्पाही उधारी मागणार नाही ..तू
फक्त परत ये .
अरे आपली माती आपली माणसे ...देश
आपला विसरू नकोस .
सिलिकॉन व्हेलीत जा ...पण माय
मराठी विसरू नको .

Monday, March 28, 2011

आई

किती वर्षे निघूण
गेली तुला काहीतरी सांगायचं होत...
पण या जिवनात मोठं
होण्याच्या नादात
लहानपणं विसरायचं होतं ...
मला आजही आठवतो तु माझा हात धरुन
काढलेला तो पहिला "शून्य" तेच माझ
पहिलं अक्षरं होत...
आज मी इतका मोठा झालो,कारण
त्या शून्याचं विश्व निर्माण
करण्यासाठी तु तुझ्या रक्ताचं
पाणी केलं होतं ...
शाळेत जाताना तुझा तो मायेचा हात
माझ्या डोक्यावर होता ,
चालताना तुझ्या त्या साडीच्या पदराचा टोक
माझ्या हातात होता ... त्या पदराचं
अस्तित्व आजही हाताला जाणवतं
होतं ...
पण,
आता घरी कोणीतरी आपलं केविलवाणं
वाट
पाहतयं असं कधीच वाटत नव्हतं ...
आजही आठवतं
जेव्हा मी घाबरलो आणि तु
मला तुझ्या त्या मायेच्या कुशीत
घेतलं ...
आज तु नाहीसं म्हणून आज
ह्या डोळ्यांमध्ये दोन थेंबांच
अस्तित्व दाटलं ...
वाटलं हातात पैसा आहे जीवन आहे "लै
भारी"
पण.....
पण.....
"आई , मी तुझ्या विना भिकारी "

अबोला सहन होईना

स्वप्न आले डोळ्यावरती चिंबभिजल्या भावना,
अश्रु सुकले थेंबावरती
ओठांवर शब्द आता का येईना...
बोलना आई हा अबोला सहन होईना..


तु शिकवल्या अक्षराची ओळ का पुसली जाईना, तुझ्या प्रेमाच्या शब्दांची सांगता आता का होईना...
शब्द रुसले सुरांवरती गीत तयार होईना..
बोलना आई,
हा अबोला सहन होईना...


लिँबोनीच्या झाडामागे तो चंद्र का जाईना...
ह्या डोळ्यांवरती झोपेचे सोंग आता का येईना..
तुझ्या त्या मायेच्या कुशीची उब आता आठवेणा
उठ आई घेणा कुशीत ,
हा अबोला सहन होईना


तु मला सोडुन गेलीस याची कल्पनाही सहन होईना...
देव का ही इतका कठोर ?
तो ही तुला परत पाठवेणा ...
भिती वाटते..
तो तुला फुला सारखं सांभाळेलना ?
आई , तु त्या ता-यात दिसलीस
तो बिचाराही विरहाने आता लुकलुकेना.
उठना आई ,
डोळे उघडंना आई,
काहीतरी बोलना आई.
तु इतकी ही का गाढं झोपलीस ?
आता कुणीच तुला का जागवेणा...
अगं ,ह्या अश्रुंनाही वाट मोकळी होईना..
बोलना आई ,
अबोला सहन होईना


ते सर्व तुला कुठे घेऊन चाललेत सांगना.
अगं आई काहीतरी बोलना.
ते दारातलं वृंदावनही आर्शिवाद आता का देईना.
आई ,
माझ्याशी तु का बोलली नाहीस ?
ह्या एका प्रश्नाचं उत्तर आता देणा..