Monday, March 28, 2011

अबोला सहन होईना

स्वप्न आले डोळ्यावरती चिंबभिजल्या भावना,
अश्रु सुकले थेंबावरती
ओठांवर शब्द आता का येईना...
बोलना आई हा अबोला सहन होईना..


तु शिकवल्या अक्षराची ओळ का पुसली जाईना, तुझ्या प्रेमाच्या शब्दांची सांगता आता का होईना...
शब्द रुसले सुरांवरती गीत तयार होईना..
बोलना आई,
हा अबोला सहन होईना...


लिँबोनीच्या झाडामागे तो चंद्र का जाईना...
ह्या डोळ्यांवरती झोपेचे सोंग आता का येईना..
तुझ्या त्या मायेच्या कुशीची उब आता आठवेणा
उठ आई घेणा कुशीत ,
हा अबोला सहन होईना


तु मला सोडुन गेलीस याची कल्पनाही सहन होईना...
देव का ही इतका कठोर ?
तो ही तुला परत पाठवेणा ...
भिती वाटते..
तो तुला फुला सारखं सांभाळेलना ?
आई , तु त्या ता-यात दिसलीस
तो बिचाराही विरहाने आता लुकलुकेना.
उठना आई ,
डोळे उघडंना आई,
काहीतरी बोलना आई.
तु इतकी ही का गाढं झोपलीस ?
आता कुणीच तुला का जागवेणा...
अगं ,ह्या अश्रुंनाही वाट मोकळी होईना..
बोलना आई ,
अबोला सहन होईना


ते सर्व तुला कुठे घेऊन चाललेत सांगना.
अगं आई काहीतरी बोलना.
ते दारातलं वृंदावनही आर्शिवाद आता का देईना.
आई ,
माझ्याशी तु का बोलली नाहीस ?
ह्या एका प्रश्नाचं उत्तर आता देणा..

2 comments: