Saturday, June 15, 2013
Friday, May 3, 2013
परीक्षेची पहिली आणि शेवटची रात्र ….
अरे, उद्यापासून पेपर चालू होत आहेत
अभ्यास झाला का ?
नाही रे,"तुझा झाला का?
कसल, काय?"अजून बुक पण नाही उघडली
."सोलिड वाट लागणार आहे ….बाय द वे ,"तुला सेंटर कुठल आल?"
माझ सोड, तुला कोणत आल ते सांग ?
चल भाय तु तर आपल्याच बरोबर आहेस फिकर नॉट आपण manage करू सगळ अशा हवेतल्या काही फुशारक्या.
अस काहीस बोलत आपल्या शाळे पासून कॉलेज पर्यंतची प्रत्येक परीक्षा चालू होते. मग , सोशल साइट वरून महत्वाचे importance शोधन,ग्रुप मध्ये चर्चा,एकमेकांना फोनाफोनी करून तर कधी नाईट मारून अभ्यासाला सुरुवात होते.हे कर हा हे लास्ट टाईम आल होत आता परत चान्सेस आहेत.तो दहा मार्क्स चा प्रश्न येणारच येणार तो करून जा बाकी ठोक सगळ मनाच. अशा गप्पा पेपरच्या आधी रंगतात आणि पेपरला सुरुवात होते.पेपर हातात कि सगळ काही वेगळ वाटत एकमेकांच्या चेहेर्याकडे बघत पेपर लिहायला सुरुवात होते.वाचलेलं सगळकाही विसरलेल असत आणि मग उत्तर लिहिणारा स्वतःच त्या विषयाचा ऑथर {लेखक} बनतो आणि उत्तर लिहायला सुरुवात होते . कसाबसा पेपर पूर्ण होतो.नंतर पेपर संपल्यावर चर्चा "शिट,यार १० मार्कचा पेपर राहिला माझा" . "मला वाटल होत ते येईल पण केल नाही यार" …"मला तर पहिले वाटल कि पेपरच पोर्शनच्या बाहेरचा आहे लिहिला कसाबसा ".सोड ना अरे बाकीच लिहिल ना… भरलास ना पेपर मग तर पास होऊनच जाशील. आणि नाहीच झाला तर भेटूच कि के.टी . exam la .पण उद्याचा जर सिरीयसली करायला पाहिजेहा तो विषय जर अवघड आहे.
पण ब-याच कॉलेजीयन्सच्या ;लाईफ मध्ये अभ्यास बाबत सिरियस हा शब्द कधी येताच नाही. रात्री नाईट मारायला बसल कि झोप लागते आणि मोबाइल वर आलाराम लाऊन अभ्यासाचा प्लान सकाळी पोस्टपोन होतो.आणि सकाळी उठल कि आता काय वाचायचं ? यात सारा वेळ निघून जातो. पहिल्या पेपरचा आधल्या रात्री सारख्याच दुसर्या, तिसर्या …. पेपरच्या रात्री सरतात….लवकरात लवकर संपावीशी वाटणारी परीक्षा संपते आणि वेकेशन मध्ये उनाडक्या करायचे प्लान तयार होतात.नंतर रिझल्ट लागतो …क़े.टी. लागते … कधी फस्ट क्लास पण भेटतो आणि ते वर्ष संपत … नेक्स्ट सेमला अभ्यास करायचा हा अशी आश्वासन एकमेकांना आणि घरच्यांना देत पुढच्या वर्षाच कॉलेज देखील चालू होत.
पण, लास्ट इयर च्या लास्ट सेमच्या परीक्षेला हे चित्र तसच असत अगदी जस च्या तस पण ते सगळ शेवटच… तो शेवटचा अभ्यास …. तो शेवटचा बेस्ट लक चा मेसेज …. रात्री झोप लागते म्हणून थर्मास मध्ये भरून ठेवलेल्या चहाचा तो शेवटचा कप आणि अभ्यासात जागवलेली ती शेवटच्या पेपरची शेवटची रात्र.हसत-रडत, दंगा-मस्ती करत कॉलेजची तीन वर्ष हसत संपलेली असतात.त्या रात्री नंतर कोण अभ्यासासाठी जागणार नसत."रात्री दोन पर्यंत तरी बसा अभ्यासाला, वर्षभर काही केल नाही आता तरी करा." अस कोण बोलणार नसत कारण ते सगळ शेवटच असत.
पेपरच्या आधी चहाच्या टपरीवर लवकर येउन केलेला अभ्यास, स्वत:हाच पुस्तक सोडून दुसर्याच्या पुस्तकातडोकाऊन केलेला तो अभ्यास आणि शेवटच एकमेकांना केलेल ते बेस्ट लक.
त्या शेवटच्या पेपर सारख सार काही संपत. ते अभ्यासच आश्वासन,टपरीवरचा चहा,सगळ्यांनी एकाच वहीत केलेला अभ्यास आणि कधी कधी पेपर लिहिण्यासाठी मागितलेला तो उधारी वरचा पेन.
शेवटच्या पेपर मध्ये लिहिलेल्या शेवटच्या वाक्याचा पुर्विराम सगळ्यालाच पूर्णविराम देऊन टाकतो. या वेळेस पुढची सेम अभ्याससाठी नसते आणि उद्या अभ्यास करून येऊ अस आश्वासन पण नसत कारण त्या वेळेस चालू झालेला असतो तो खरा जीवन प्रवास.… एक "रेस" जिथे मित्र नसतात नातेवाईक नसतात…तिथे असतात ते फक्त कॉमपेटिटर्स .त्यात धावणारे असतात पडणारे असतात कधी सावरणारे पण असतात पण जो तो धावत असतो ते फक्त स्वतः जिकण्यासाठी.आणि या स-यात आठवणीत राहिलेली असते ती फक्त परीक्षेची शेवटची रात्र.
-नकळत
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]
Monday, April 8, 2013
खरचं वाटत यार तिने मला कधीतरी असं अचानक भेटावं..........
खरचं वाटत यार तिने मला कधीतरी
असं अचानक भेटावं..........
त्याच वेळी कसं आकाशात आभाळ दाटावं...
आणि तिने माझ्या सोबत चालावं
मी तिच्या डोळ्यात अन् ,
तिने माझ्या डोळ्यात कसं निरंतरा पर्यँत पहावं...
बाजाराच्या ठिकाणी तिने आई सोबत यावं..
आणि माझ्या आतुरलेल्या नजरांना
तिने हळूच असं पहावं.....
त्या गर्दीचा फायदा उठवत ,
मी ही तिच्या बाजुला जाऊन
कसं फुला सारखं उभ रहावं ...
तिने माझ्या हातांना नकळत स्पर्श करताना
हळूच कसं लाजावं...
खरचं वाटत यार तिने मला कधीतरी असं अचानक भेटावं....
तिच्या अचानक भेटण्याने
माझ्या शब्दांनी कसं मुक होऊन जावं.....
त्या नजरांच्या झरोक्यात पुढचं संभाषन व्हाव.
त्या नजरांच्या भाषेत एखादं वाक्य अडावं
तिने नकळत हसून हळुच असं लाजावं...
खरचं वाटत यार तिने मला कधीतरी असं अचानक भेटावं.....
त्या रीमझिमना-या पावसात
तिने त्या नेहमीच्या झाडाखाली आडोशाला भेटावं
हळूच येऊन माझ्या शरीराला खेटावं...
त्या रीमझिना-या पावसात
त्या वा-याने कसं संथपणे अंगावरुन जावं
तिच्या अंगावरही शहार यावं...
तिने काय आणि मी काय त्या प्रेममिलनात धुंद होऊन जावं...
खरचं वाटत यार तिने मला कधीतरी असं अचानक भेटावं...........
खरचं तिने अचानक भेटावं...........
-नकळत
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]
Saturday, April 6, 2013
तिचा स्पर्श म्हणजे एखाद्या वा-याच्या झुळके प्रमाणे व्हायचा …
आज तिच्या सोबत खूपच आनंद आला…
....
....
तिच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळी चाहूल होती ….
....
....
तिच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळी चाहूल होती ….
....
...
जेव्हा ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवायची…….
माझा हात.... ती, स्वत:च्या मिठीत गच्च पकडायची……….
माझ्या बोटांमध्ये तिची बोट अलगत पणे
माझा हात.... ती, स्वत:च्या मिठीत गच्च पकडायची……….
माझ्या बोटांमध्ये तिची बोट अलगत पणे
घट्ट गुर्फटायची………
इतकी घट्ट कि त्या स्पर्शातच सार काही समजायचं ……
अगदी सार काही ……
आमची भेट व्हायची तेव्हा फक्त तीच बोलायची ….
मला कधी बोलताच नाही आलं ….
माझ लक्ष असायचं ते फक्त ते तिच्या निरागस डोळ्यानं मध्ये…
ती बोलताना मला हसायला यायचं ……आणि आजही येत ….
आमची भेट व्हायची तेव्हा फक्त तीच बोलायची ….
मला कधी बोलताच नाही आलं ….
माझ लक्ष असायचं ते फक्त ते तिच्या निरागस डोळ्यानं मध्ये…
ती बोलताना मला हसायला यायचं ……आणि आजही येत ….
मी हसायचो आणि मग ती बोलायची, "का, हसलास रे ?"…….
मी बोलायचो,"माहित नाही" ….
खरच मी का हसायचो किंवा का हसतो मला खरच नाही माहित ……………
मग ती रुसायची ….
ती रुसलेली असताना खूप छान दिसायची
मी बोलायचो,"माहित नाही" ….
खरच मी का हसायचो किंवा का हसतो मला खरच नाही माहित ……………
मग ती रुसायची ….
ती रुसलेली असताना खूप छान दिसायची
….
तिचे ते नाजूक डोळे बारीक करायची ………
नाकावर राग आला कि तीच ते छोटास नाक लाल व्हायचं ……
आणि मग ती माझ्याच शर्टाला नाक पुसायची ……
तिचा स्पर्श म्हणजे एखाद्या वा-याच्या झुळके प्रमाणे व्हायचा …
स्पर्श जाणवायचा पण अस्तित्व नाही ….
………….
…………
आणि मग ती माझ्याच शर्टाला नाक पुसायची ……
तिचा स्पर्श म्हणजे एखाद्या वा-याच्या झुळके प्रमाणे व्हायचा …
स्पर्श जाणवायचा पण अस्तित्व नाही ….
………….
…………
तसं तिचं अस्तित्व मला कधी प्रत्येक्षात अनुभवायलाच नाही भेटलं ….
……….
…….
ती माझ्या आयुष्यात नाही…
… …
ती माझ्या आयुष्यात नाही…
… …
नव्हती ….
कधीच नव्हती …
होता तो फक्त आभास ….
कधीच नव्हती …
होता तो फक्त आभास ….
…
…
आमची भेट म्हणजे ………
एक कल्पना……
एक कल्पना……
ती ही काल्पनिक कल्पना ….
आज हि मला ती भेटते ……….
माझ्या समोरच असते ती ……
पण एकदम गप्प गप्प ….
तिचे फक्त डोळेच बोलतात ….
आज हि मला ती भेटते ……….
माझ्या समोरच असते ती ……
पण एकदम गप्प गप्प ….
तिचे फक्त डोळेच बोलतात ….
एका चुकार शब्दाचाही संवाद नाही ……
…
…
…
…
आजही तिला स्पर्श करावासा वाटतो …
पण मोबाईलची स्क्रीन आडवी येते …
पण मोबाईलची स्क्रीन आडवी येते …
….
ती म्हणाली मला विसरून जा ….
अगं ,प्रेम करतो ग तुझ्यावर …… अजून किती राग करणार ?
अजून किती काल्पनिक भेटी करायच्या ?
आणि मनाची समजूत घालायची ?
अगं ,प्रेम करतो ग तुझ्यावर …… अजून किती राग करणार ?
अजून किती काल्पनिक भेटी करायच्या ?
आणि मनाची समजूत घालायची ?
…
…
आजही फक्त तुझा फोटो पाहूनच तुझ्याशी गप्पा मारतो ….
आणि काल्पनिक तुझ्या अस्तित्वाचा खेळ मांडतो….
सत्यात ये कधी तरी ….
मी अजूनही तिथेच आहे …
तुझी वाट पाहत उभा ….
त्याच वळणावर जिथे मला तू पहिल्यांदा दिसली होतीस ….
मी अजूनही तिथेच आहे …
तुझी वाट पाहत उभा ….
त्याच वळणावर जिथे मला तू पहिल्यांदा दिसली होतीस ….
-नकळत
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]
Friday, March 29, 2013
रडू न्हगं रं लेकरा by-- आशित साबळे.
रडू न्हगं रं लेकरा by-- आशित साबळे.
म्या बा शेतमजूर मालक,
काहीतरी करून खाईन...
येका तरी येळची भाकर,
पोटासाठी लई व्हईन...
दुस्काळानं हिंडतो गावागावा,
कुनीतरी तरी घोटभर पानी द्यावा,
कोरड पडली जल्माला,
घसा तरी वला करून परत जाईन...
रडू न्हगं रं लेकरा,
जे डोळ्यात हाय, ते बी सुकून जाईन...
बगा बगा व लेकरू माझं,
चिरकुन घसा कोरडा पडलाय,
डोळ्यातून पानी येईना झालं,
म्हनत आसन तितकं तरी चाटायला व्हईन...
तिकडं म्हनं हजारो लिट्राच्या पिचकाऱ्या उडीवतेत,
कुनीतरी घेऊन चला ना तिकडं,
धर्माच्या नावावर का व्हईना, खोटारडे जमतेत तिकडं,
म्या बी निसर्गानं दिलेलं पानी पिईन...
लाजा वाटान्हात त्यान्ला, हिकडं काय झालंय ते म्हाईत न्हवं का,
वाटलं न्हवतं आमचंच खाऊन आमच्यावरच उलटे व्हतीन...
लय भ्याव वाटतंय गुरांचे सांगाडे बघून,
गावाकडं शिरप्या माझा काय म्हनीन...
जित्ता जातोय का घरला ते बी ठावं न्हाय,
कुनाला म्हाईत आता आमचं काय व्हईन...
- आशित साबळे
Wednesday, March 20, 2013
क्षणात फोन पण कट झाला सॉरी ………… केला …
ते प्रेम जवळ जवळ दीड वर्ष मनात जपलेल ….
संवाद फक्त काही क्षणांचा …
………
…………
………………
मन पासून प्रेम होत ….
प्रत्येक क्षणा क्षणाला तिची आठवण मनात असायची ……
प्रत्येक्षात ती मला कधीच नाही भेटली …….
पण हृदयाच्या त्या नाजुकश्या हालचाली सारख तीच अस्तित्व जाणवायचं ….
……….
……
तिला एकदिवस भेटून सांगेन ठरवल होत.….
तिच्या भावाशी बोलन झालं …भेटण्यासाठी नकार आला ……
तिच्या मैत्रिणीन सोबत बोलन झाल…. आम्ही की करू…. ? सांगून बघतो …
अशीच उत्तर ……
तरी भेटण्यासाठीचा अखंड प्रवास चालूच…। आतच मनाची तडफड …भेटण्यासाठी कासावीस….
दीड वर्षाच्या आठवणींच्या प्रवास नंतर अखेर तो दिवस आज आलाच होता …
तिच्या मैत्रिणीच्या फोनवर फोन केला ती बाजूलाच होती…………
तिच्याकडे तिने फोन दिला जो आवाज ऐकण्यासाठी कान बेचेन झाले होते हृदयाची गती वाढली होती …
एकही शब्द मला miss करायचा नव्हता ……शब्दन शब्द अलगद झेलायचा होता …
जो आवाज मला जीवनभर आयुष्याचा सोबती म्हणून ऐकायचा होता…
फक्त काही क्षणात सर आटोपलं …
मी फक्त २ मिनिट मागितले होते ……
सार काही फक्त ५ सेकंदात संपेल अस वाटलच नव्हत ……
……
…
.
.
.
पण ते संपल होत …
तो एकच शेवटचा क्षण …… दीड वर्षाच्या प्रतिक्षेची किंमत काय तर रागात बोलायचे ते दोन शब्द ….
आणि तो पाच सेकंदाचा कालावधी ….
मला बोलताच नाही आल कारण, तिला बोलताना मला थांवायचं नव्हत …
क्षणात फोन पण कट झाला सॉरी ………… केला …
.
.
.
आता तिच्यासाठी परत वाट पहावी का तिला विसरून जाव ………. ?
.
प्रेम विसरण्यासाठी केल असत तर कधीच विसरलो असतो,
पण माझ प्रेम इतक तकलादू नव्हत कि कोणी तरी बोलाव आणि मी ते विसराव …
कदाची आता ते विसराव लागेल………
हो , विसरावंच लागेल कारण,
"तिच्यावर प्रेम करण्याची चुकी मी केली होती" ……
. .
पण आता या वेड्या मनाची कशी समजूत घालू ?
जे आजही तिच्या येण्याची आस लाऊन आनंदात तिची वाट पाहतोय …
माझ्या दुखा: साठी मी त्याच्या सुखाचा लचका नाही तोडू शकतना……….
-नकळत
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]
संवाद फक्त काही क्षणांचा …
………
…………
………………
मन पासून प्रेम होत ….
प्रत्येक क्षणा क्षणाला तिची आठवण मनात असायची ……
प्रत्येक्षात ती मला कधीच नाही भेटली …….
पण हृदयाच्या त्या नाजुकश्या हालचाली सारख तीच अस्तित्व जाणवायचं ….
……….
……
तिला एकदिवस भेटून सांगेन ठरवल होत.….
तिच्या भावाशी बोलन झालं …भेटण्यासाठी नकार आला ……
तिच्या मैत्रिणीन सोबत बोलन झाल…. आम्ही की करू…. ? सांगून बघतो …
अशीच उत्तर ……
तरी भेटण्यासाठीचा अखंड प्रवास चालूच…। आतच मनाची तडफड …भेटण्यासाठी कासावीस….
दीड वर्षाच्या आठवणींच्या प्रवास नंतर अखेर तो दिवस आज आलाच होता …
तिच्या मैत्रिणीच्या फोनवर फोन केला ती बाजूलाच होती…………
तिच्याकडे तिने फोन दिला जो आवाज ऐकण्यासाठी कान बेचेन झाले होते हृदयाची गती वाढली होती …
एकही शब्द मला miss करायचा नव्हता ……शब्दन शब्द अलगद झेलायचा होता …
जो आवाज मला जीवनभर आयुष्याचा सोबती म्हणून ऐकायचा होता…
फक्त काही क्षणात सर आटोपलं …
मी फक्त २ मिनिट मागितले होते ……
सार काही फक्त ५ सेकंदात संपेल अस वाटलच नव्हत ……
……
…
.
.
.
पण ते संपल होत …
तो एकच शेवटचा क्षण …… दीड वर्षाच्या प्रतिक्षेची किंमत काय तर रागात बोलायचे ते दोन शब्द ….
आणि तो पाच सेकंदाचा कालावधी ….
मला बोलताच नाही आल कारण, तिला बोलताना मला थांवायचं नव्हत …
क्षणात फोन पण कट झाला सॉरी ………… केला …
.
.
.
आता तिच्यासाठी परत वाट पहावी का तिला विसरून जाव ………. ?
.
प्रेम विसरण्यासाठी केल असत तर कधीच विसरलो असतो,
पण माझ प्रेम इतक तकलादू नव्हत कि कोणी तरी बोलाव आणि मी ते विसराव …
कदाची आता ते विसराव लागेल………
हो , विसरावंच लागेल कारण,
"तिच्यावर प्रेम करण्याची चुकी मी केली होती" ……
. .
पण आता या वेड्या मनाची कशी समजूत घालू ?
जे आजही तिच्या येण्याची आस लाऊन आनंदात तिची वाट पाहतोय …
माझ्या दुखा: साठी मी त्याच्या सुखाचा लचका नाही तोडू शकतना……….
-नकळत
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]
Sunday, March 17, 2013
मी तुझ्यावर आज हि तितकंच प्रेम करतो …
मी तुझ्यावर आज हि तितकंच प्रेम करतो …
कदाचित तुला प्रेम म्हणजे की हे कधीच उमगले नाही …
मी काही न बोलता उगाच तुझ्यावर प्रेम करत राहिलो का ?
मला आजही फक्त तू हवी आहेस.….
किमान एकदा तरी बोलून बघ…
किती दिवस तू हा असा अबोला धरून बसणार ?
एक वर्ष …. एक महिना…. एक दिवस.…
यापेक्षा हि खूप कालावधी लोटला आता….
रुसवा,फुगवा सोडून भेट एकदातरी…
मला आयुष्यात फक्त तू हवी आहेस बाकी काहीच नको…
मी प्रेम केल ते त्या निरागस डोळ्यांवर….
मी प्रेम केल त्या नाजुकश्या ओठांवर .…
….
…….
………
अस. मी कधीच नाही बोलणार
कारण,मी तुझ्या मनावर प्रेम करतो बाकीच्या गोष्टी तर खूप थिल्लर आहेत.….
तुला एकदा शेवटच भेटेन म्हणतोय ….
कदाचित माझ्या नशिबात आणि हृदयात
या मध्ये फक्त एवढाच फरक आहे
जो ह्रदयात आहे,
तो नशिबात नाही ...
आणि....?
जो नशिबात आहे
तो ह्रदयात नाही .....
पण जरी माझ्या नशिबात नसलीस तरी माझ्या ह्रदयात तुझी जागा कोणी घेऊ देखील शकणार नाही…
आणि मी ती कोणाला देणार ही नाही…
प्रेम हा काही भातुकलीचा खेळ नाहीये कि आपल्या मर्जी नुसार सगळ बदलत रहाव…
मी तुझ्यावर प्रेम करतो आणि कायम करणार…
नाही तरी जीवनात हवी असलेली व्यक्ती आणि स्वतः ला पडलेल्या प्रश्नांची उत्तर कधी सापडतच नाही ….
विचारातून काढलाय केव्हाच तुला
पण माझ्या काव्यातून तू जात नाही
काळजात बसली तू अशी कि
तुजा चेहरा क्षणभरही नजरेआड होत नाही..!!!!!
तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही.....
-मनाची वेदना [कृणाल चिलप(K.K.) ]
Saturday, March 16, 2013
शेवटचे पान
वहीचे शेवटचे पान पहिल्या पानापेक्षा निराळे असते. या दोन पानांत मैलाचे अंतर असते. पहिले पान देखाव्याचे किती किती सोवळे. शेवटला देखावा नाही मनाने पण मोकळे. पहिल्यावर एक सुटसुटीत नाव एकच पत्ता एकच गाव आणि "शेवटच्या पानावर ?"कोणाचेही पत्ते, कोणाचीही नावे शेवटच्या पानाची अनेक गावे.
शेवटच्या परीक्षेचा रिझल्ट लागला का आपल्या वह्या रद्दीची वाट भागतात पण त्यावर आपल ते वर्ष अवलंबून होत कधी कधी आपण ते विसरतो.तीच रद्दीच्या ढिगार्या
आज ही त्या शेवटच्या पानावरची अक्षरे आपल्या मनात जपून ठेवलेल्या शाळा,काँलेजच्या आठवणींना उजाळा देतात.आणि लेक्चर मधल आपल अक्षर बाईंचा शेरा सगळाच कस आपल्या नजरे समोर तो बोलपट धावू लागतो. त्या पानावर नेहमीच असायच्या अबोल पण नकळत व्यक्त झालेल्या भावना,त्यावर लेक्चर मध्ये केलेला टाइमपास नावत्या शिक्षकांच्या तासाला "आपल्या केवडा" कडे टाकलेला कटाक्ष व तिच्यावर लिहिलेली ती मोडकी तोडकी,त ला त भिदाव्लेली चार ओळी देखील त्या पानावरच असायची.
त्या पानावर काढलेल ते बदामाच चित्र त्या खाली केलेली नावांची खोडी..त्या अक्षरांवर कस आख्या वहीचा सार असल्या सारख वाटत कारण वाहिचीई आधीची पान तर फक्त मार्क मिळवायला मदत करायची आणि शेवटच पानावर हीच अक्षरे जीवनात पुढे जाण्या साठी काहीस अबोल संदेश देऊन जायची.
मस्ती करण्यासाठी एकमेकांना कागदाचे बोले फेकून मारण्या साठी याच पानाचे लचके तोडले जायचे.पण या पाने कधीच याची तक्रार दाखून दिली नाही. एकाद्या विषयाची वही आणली नाही तर कोणत्याही वहीच्या शेवटच्या पण पासून नवीन वही मग सालच कस ते उलट उलट लिहित जान.
या शेवटच्या पानावरच्या आठवणीमनाला फार छळतात तर कधी फार आनंद देतात तर कधी डोळ्यात पाणी आणतात...कर एकदा मला आमच्या बाईनी फुली गोळा खेळताना पकडल आणि मग काय.शेवटच पान फाडून मुख्याध्यापकाना दाखवायला तेच पान फाडून पुरावा करण्यात आला होता.मार खाला त्याच की वाल नाही पण शेवटच पण फाडल्या मुळे माझ्या नावच पण पण नकळत निघाल होत.पाहिलं आणि शेवटच पान एकच असायचं पण मधल्या स्टेपलर मुळे त्यांच्यात अंतर पडल पहिल्याचा तोरा, भारी डौल
नाही कळायचे शेवटाचे मोल. शेवटच्या पानाला उभ्या, आडव्या, तिरक्या रेघोट्या विविध आकृतींच्या अनेक राहुट्या. कुणीही यावे लिहून जावे आपले नाव ठेवून जावे . हि दोन पण एकच असून त्यात इतक अंतर कस पडल हे मला कधीच समजलाच नाही.वही मध्ये जपावे ते शेवटचे पान कुणीही दावी आपली शान राग नाही, लोभ नाही सगळेच कसे सम समान कुणाचे काहीही होवो,..... .. माझे मात्र एक व्हावे होता आले तर माझे जीवन शेवटचे पान व्हावे!
नाही कळायचे शेवटाचे मोल. शेवटच्या पानाला उभ्या, आडव्या, तिरक्या रेघोट्या विविध आकृतींच्या अनेक राहुट्या. कुणीही यावे लिहून जावे आपले नाव ठेवून जावे . हि दोन पण एकच असून त्यात इतक अंतर कस पडल हे मला कधीच समजलाच नाही.वही मध्ये जपावे ते शेवटचे पान कुणीही दावी आपली शान राग नाही, लोभ नाही सगळेच कसे सम समान कुणाचे काहीही होवो,..... .. माझे मात्र एक व्हावे होता आले तर माझे जीवन शेवटचे पान व्हावे!
--- संकलन --- कृणाल चिलप
..ती गेली अन ...
...ती गेली अन ...
दारातल्या वृन्दावनाने आशीर्वाद
देणे बंद केले
घरातल्या पोरांनी शुभंकरोती म्हणणे
बंद केले
ती गेली अन ...
पहाटेने भूपाळी म्हणणे बंद केले..
तिन्हीसांजेने सांजवात करणे बंद
केले ...
ती गेली अन...
अंधार्या राती वाट शोधणे बंद झाले
आणि धडपडल्यावर मायेचा पदर शोधणे बंद
झाले ..
छान छान कुशीत शिरून घट्ट झोपणे बंद
झाले
अन
अंगणातूनच "आई आई ! " ओरडणे बंद झाले
ती गेली अन...
आम्हीच घराला "घर" म्हणणे बंद केले
THIS IS NOT MINE
दारातल्या वृन्दावनाने आशीर्वाद
देणे बंद केले
घरातल्या पोरांनी शुभंकरोती म्हणणे
बंद केले
ती गेली अन ...
पहाटेने भूपाळी म्हणणे बंद केले..
तिन्हीसांजेने सांजवात करणे बंद
केले ...
ती गेली अन...
अंधार्या राती वाट शोधणे बंद झाले
आणि धडपडल्यावर मायेचा पदर शोधणे बंद
झाले ..
छान छान कुशीत शिरून घट्ट झोपणे बंद
झाले
अन
अंगणातूनच "आई आई ! " ओरडणे बंद झाले
ती गेली अन...
आम्हीच घराला "घर" म्हणणे बंद केले
THIS IS NOT MINE
Subscribe to:
Posts (Atom)